धक्‍कादायक ! एकाच कुटूंबातील 5 जणींचा विहिरीत मृतदेह आढळल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ, ‘हत्या की आत्महत्या’ तपास सुरू

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाईन – बुलढाण्यात आईसह ४ चिमुकल्या मुलींचे मृतदेह विहिरीत आढळून आले आहेत. मेहकर तालुक्यातील माळेगावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आई उज्वला ढोके (वय ३५), मुलगी वैष्णवी ढोके (वय ९), दुर्गा ढोके (वय ७), आरुषी ढोके (वय ४), पल्लवी ढोके (वय १) अशी मृतांची नावे आहेत. आईसह ४ मुलींची हत्या करण्यात आली की ही आत्महत्या आहे याबाबत अद्याप काहीही कळू शकलेले नाही. या प्रकरणाचा पोलीस शोध घेत आहेत.

मेहेकर तालुक्यातील माळेगाव परिसरात असलेल्या एका विहिरीत सोमवारी सकाळी पाच मृतदेह तरंगत असल्याचे शेतकऱ्यांना दिसले. गावकऱ्यांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह बाहेर काढले असून, शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच या घटनेचा उलगडा होऊ शकेल अशी माहिती पोलिसांनी दिली. एकाच घरातील चौघींचा मृतदेह विहिरीत सापडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून भीतीचेही वातावरण पसरले आहे.

Visit : Policenama.com

You might also like