पुणे : किरकोळ भांडणातून एकाचा खून 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील बुधवार पेठ भागात किरकोळ भांडणातून एकाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (शनिवार) दुपारी घडली, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

तानाजी धोंडीराम कोरके असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु असून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , तानाजी कोरके हा गुन्हेगार आहे, तो आपल्या मित्रांसोबत दारू पिण्यासाठी बसला होता. किरकोळ कारणावरून तानाजीचे त्याच्या  मित्रासोबत भांडण सुरु झाले. भांडण वाढत गेल्याने हाणामारीत रूपांतर झाले. यामध्ये तानाजीला जबर जखमा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी दोघाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दिवसा झालेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल केला आहे.