अहमदनगर जिल्ह्यात कार कोसळून एका महिलेचा मृत्यू, 3 जखमी

मढी/पाथर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – पाथर्डी तालुक्यातील मढी-मच्छिंद्रनाथगडाच्या रस्त्यावरील मायंबा घाटातत 80 फूट खोल दरीत कार कोसळून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. तर इतर 3 जण जखमी झाले आहे. हा अपघात आज दुपारी साडेतीनच्या सुमारास झाला. कार मच्छिंद्रनाथ गडावरून पाथर्डी तालुक्यातील खरवंडीच्या दिशेने चालली होती.

बकुळा लक्ष्मण वाघ (वय -48 रा. खरवंडी कासार, पाथर्डी) असे मृत महिलेचे नाव आहे. माधुरी वसंत खाडे (वय-22 रा. खेड, जि. सातारा), असे एका जखमी महिलेचे नाव आहे. ही महिलाच कार चालवत असल्याची माहिती मिळाली. इतर दोन जखमींचे नावे समजू शकली नाहीत. मूळचे सातारा जिल्ह्यातील भाविक मच्छिंद्रनाथ गडावर देवदर्शन आटोपून खरवंडी येथील पाहुण्यांकडे निघाले होते.

अपघात झाला त्यावेळी कारमध्ये चौघेजण होते. यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुष होते. माधुरी खाडे या कार चालवत होत्या. घाट उतरत असताना कार 80 फूट खोल दरीत कोसळली. यात कार चालक माधुरी खाडे या जखमी झाल्या. दोन इतर प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पाथर्डी येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. निमुळत्या रस्त्याचा व धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. घाटातून जाणाऱ्या रस्त्याला संरक्षक कठडेही बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/