कांद्याला भाव नाही तर सरकारला शेतकऱ्यांचे मत नाही

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – पुढील फेब्रुवारी महिण्यातील २४ तारखेला चांदवड येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिषद होणार आहे. या परिषदेत कांद्याला भाव नाही तर कोणत्याही सरकारला शेतकऱ्यांचे मत नाही अशी भूमिका घेतली जाईल. असे प्रहार संघटनेचे आमदार बच्चु कडू यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यातील सटणा येथील तालुक्यात शेतकऱ्यांच्या बैठकीसाठी आमदार बच्चू कडू येथे आले होते. त्यांत ते बोलत होते. जिल्ह्यातील कांदा उत्पादकांचे प्रश्न अतिशय विकोपाला गेले आहे. त्याकडे राज्य सरकारचे लक्ष नाही. सध्याच्या चालू परस्थितीला कांद्याचे भाव कोसळे आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था नाजूक झाली आहे. त्याला सरकारचीच धोरण जबाबदार आहेत. त्यासाठी सरकारने तातडीने कृती करण्याची गरज नाही. मात्र त्याकडे लक्ष देण्यास सरकारला वेळ नाही. त्यामुळे शेतकरी संतत्प आहे.

आम्ही राज्याच्या विविध भागात जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहोत. येत्या २४ फेब्रुवारीला चांदवड येथे शेतकरी परिषद आहे. या परिषदेत आम्ही निर्वाणीचा लढा उभारण्यावर लक्ष केंद्रीत करु. यापुढच्या काळात कांद्याला भाव नाही तर सरकारला मत देणार नाही. शेतकरी संघटीत होऊन कांदयाला भाव नाही, तर आगामी निवडणुकांत मत नाही. मतदान न करण्याचे आंदोलन व प्रबोधन आम्ही करणार आहोत.” चांदवडची शेतकरी परिषद त्यासाठी निर्णायक ठरेल असा विश्‍वास आमदार बच्चू कडू व्यक्त केला.