परीक्षा देऊ न शकलेल्या मुलांसाठी Good News, शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव असताना आलेला महापूर आणि Online परीक्षांचा उडालेला फज्जा यामुळे अनेक विद्यार्थी (Student) परीक्षा (Exam) देऊ शकले नाहीत. तर अनेकांना काही पेपर्स देता आले नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांची काळजी वाढली होती. अशा सगळ्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही 10 नोव्हेंबरपूर्वी घेण्यात येईल अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (uday samant) यांनी केली आहे. मात्र परीक्षा योग्य पद्धतीने पार पडल्या नाहीत अशा सर्व कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सामंत यांनी सांगितले की, एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल. विद्यापीठ परीक्षा हाणून पाडण्यासाठी सायबर हल्ला झाला का याचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. परीक्षा योग्य पद्धतीने का होऊ शकल्या नाहीत यासाठी 4 सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे. 10 नोव्हेंबरपासून ही समिती काम करणार आहे. सीईटी (CET) परीक्षा तालुका स्तरावर कशी करता येईल याविषयी तयारी सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्यात काय झालं ?

राज्यभरातल्या अनेक विद्यापीठांमध्ये Online परीक्षांचा फज्जा उडाला. मुंबई विद्यापीठातल्या आयडॉल परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. यावरुन विद्यार्थ्यांनी प्रचंड गोंधळ घातला. तर पुणे विद्यापीठामध्येही परीक्षा योग्य पद्धतीने होऊ शकल्या नाहीत. तिथेही कुलगुरूंवर टीकेचा भडिमार झाला होता. विदर्भातल्या अमरावतीमधल्या विद्यापीठात तर तीन वेळा परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. त्यामुळे युवासेनेच्या कार्य़कर्त्यांनी अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या ऑफिसमध्ये राडा घालत कुलगुरूंची खुर्ची आणि इतर सामानाची तोडफोड केली.

You might also like