Online Ration Card | रेशन कार्डसंबंधी आता ‘या’ सुविधा मिळणार ऑनलाइन, कशी आहे पद्धत?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Online Ration Card | रेशन कार्डवर सरकार आपल्या राज्यातील गरजू, गरीब कुटुंबाना धान्य देते. अनेकवेळा रेशन कार्ड (Ration Card) अपडेट करण्यासाठी किंवा डुप्लीकेट कॉपी (Duplicate Copy) बनवण्यासाठी किंवा नव्या रेशन कार्डसाठी अर्ज करताना अडचणी येतात. अशातच आता सरकार आपल्या डिजिटल इंडिया अभियानांतर्गत (Digital India Campaign) समस्या सोडवत आहे. (Online Ration Card)

 

तुम्ही रेशन कार्ड संबंधित (Online Ration Card) सेवांसाठी तुमच्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटर मध्ये (Common Service Center) माहिती घेऊ शकता. याबाबत डिजीटल इंडियाने एका ट्विटद्वारे माहिती दिली आहे. कॉमन सर्विस सेंटर सुविधेने इलेक्ट्रॉनिक्स (Electronics) आणि माहिती तंत्रज्ञान (Information Technology) मंत्रालयाच्या अंतर्गत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागासोबत सामंजस्य करार केला आहे.

 

देशभरातील 3.70 लाख CSC मार्फत रेशन कार्ड सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या भागीदारीचा देशभरातील 23.64 कोटीहून अधिक रेशन कार्डधारकांना फायदा होणार आहे.

कोणत्या सेवा मिळणार?

– रेशन कार्ड हरवल्यास नव्या कार्डसाठी अर्ज करु शकता.

– कॉमन सर्विस सेंटरद्वारे रेशन कार्डचे तपशील अपडेट केले जाऊ शकतात.

– इथे आधार सीडिंगही करता येते.

– रेशन कार्डसंबंधी तक्रारी कॉमन सर्विस सेंटरद्वारे करु शकता.

– रेशन कार्डची डुप्लिकेट प्रिंटही काढता येते.

 

3 प्रकारचे रेशन कार्ड
रेशन कार्ड हे तीन प्रकारचे असतात. गरीबी रेषेच्या वरील लोकांसाठी APL, गरीबी रेषेच्या खालील लोकांसाठी BPL आणि सर्वात अतिशय गरीबांसाठी Antyodaya असे कार्ड असतात. ही कॅटेगरी व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नावर ठरते. भारतीय नागरिकत्व असणारा प्रत्येक व्यक्ती रेशन कार्डसाठी अर्ज करु शकतो. 18 वर्षाखालील मुलाचं नाव आई-वडिलांच्या नावे जोडले जाते. 18 वर्षाहून अधिक वयोगटातील व्यक्ती रेशन कार्डसाठी अर्ज करु शकतात.

 

Web Title :- Online Ration Card | ration card common service centre online service

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Tax Planning | इन्कम टॅक्स वाचवण्याच्या 7 पद्धती, 31 मार्चपूर्वी करा ‘हे’ उपाय

 

PF New Rules | नोकरदारांसाठी मोठी बातमी! PF च्या नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल, जाणून घ्या सविस्तर

 

Coronavirus in Maharashtra | दिलासादयक ! राज्यात नव्या कोरोना रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट, जाणून घ्या आकडेवारी