Online Search | सावधान ! ऑनलाइन सर्च करताय? ‘बॅड बॉट्समुळे होऊ शकते नुकसान, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Online Search | ऑनलाइन सर्च (Online Search) करताना सावध राहणे आवश्यक आहे. कारण इंटरनेटवर एकूण ट्रॅफिकच्या 40 % ट्रॅफिक हे बॅड bots चे आहे. य़ा माध्यमातुन सायबर हल्ल्याचे शिकार होऊ शकता. दरम्यान बॉट्स म्हणजे नेमकं काय आहे. तसेच बॅड आणि गुड बॉट्स काय असतात? बॉट्स हे एक सॉफ्टवेअर प्रोग्राम असतात, जे ऑटोमेटेड प्रीफर्ट टास्कसाटी (Bots) तयार केले जातात. याबाबत जाणुन घ्या.

गुड बॉट्स (Good bots) तुमचा व्यापार आणि तुम्हाला फायदा पोहचवतात.
जेव्हा तुम्ही काही सर्च करता, त्यावेळी अनेक सर्च रिझल्ट समोर येतात.
एकप्रकारे हे सर्च इंजिनची मदत करतात. गुड बॉट्सला प्रसिद्ध कंपन्यांच्या माध्यमातुन तयार केले आहे.
परंतु बॅड बॉट्सला सायबर अटॅक, बेकायदेशीर कामांसाठी तयार केले जाते.

ऑटोमेटेड सायबर हल्ल्यांच्या संख्येत वाढ…

सायबरसिक्योरिटी फर्म Barracuda च्या रिपोर्टनुसार, बॅड बॉट्सची संख्या इंटरनेट ट्रॅफिकमध्ये (Internet traffic) वेगाने वाढत आहे. ही संख्या ४० टक्क्यांवर पोहचली आहे.
Barracuda कडून Bot attacks: Top Threats and Trends शीर्षकाखाली एक अहवाल जारी केला आहे. दरम्यान, या रिपोर्टमध्ये कशाप्रकारे इंटरनेटवर ऑटोमेटेड सायबर हल्ल्यांची संख्या वाढते.
जे इंटरनेटवर वेगाने वाढणाऱ्या ट्रॅफिकसाठी धोकादायक आहे, याची माहिती दिलीय.
म्हणुन, इंटरनेटवर काहीही सर्च करताना सावध राहण्याची आवश्यकता आहे.
सिक्योरिटी फर्मने 2021 च्या सुरुवातीच्या 6 महिन्यात विश्लेषण करत ही माहिती गोळा केलीय.

 

ई-कॉमर्स अ‍ॅप्लिकेशन (E-commerce application) आणि लॉग-इन पोर्टलवर (Login Portal) सर्वाधिक बॉट्स हल्ले झाले आहेत. सर्वाधिक बॉट ट्रफिक AWS आणि Microsoft Azure च्या
माध्यमातून येते. नॉर्थ अमेरिकेत 67 % बॅड बॉट्स ट्रॅफिक आढळले.
यातील बहुतांश ट्रॅफिक पब्लिक डेटा सेंटरमधून येते.
यात यूरोपममधून बॅड बॉट्स ट्रॅफिक होस्टिंग सर्व्हिस अथवा रेसिडेंशियल आयपीएस (Internet Protocol) च्या माध्यमातुन होते.
या दरम्यान जवळपास 60 टक्के बॉट्स मॅलेशियल अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये सहभागी आहेत.
हे बॅड बॉट्स तुमचा डेटा चोरी करू शकतात. सोबतच, साइटच्या परफॉर्मेंसवर परिणाम करू शकतात.
त्यामुळे अशा बॉट्सला ओळखणे गरजेचे आहे. बॉट ट्रॅफिकला ब्लॉक करणे गरजेचे आहे.
असं संशोधनातुन समोर आलं आहे.

Web Title : Online Search | science technology bad bots make up a huge amount of all internet traffic

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Pune Coronavirus | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 252 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Kalyan Crime | धक्कादायक ! कल्याणमध्ये भरदिवसा विवाहितेची दगडाने ठेचून हत्या

Gravittus Foundation | तृतीयपंथीयांच्या मदतीसाठी उषा काकडे यांच्या ‘ग्रॅविटस’ संस्थेचा पुढाकार