Pune Crime | बनावट गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा; 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे / वडगाव मावळ : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Crime | बनावट गुटखा तयार करणाऱ्या (manufacturing fake gutkha) पुणे जिल्हयातील (Pune Crime) वडगाव येथील एका कारखान्यावर पोलिसांनी छापा (Wadgaon factory raid) टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी कच्चा माल, यंत्रसामग्री, कार असा एकूण 11 लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (12 lakh worth property confiscated) केला आहे. याप्रकरणी श्रीकांत बाळू चांदेकर Shrikant Balu Chandekar (वय-32 रा. ढोरे वाडा, वडगाव मावळ) याला अटक (Arrest) केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची निर्मिती, साठवण, विक्री व वाहतूक करण्यास बंदी आहे. असे असताना वडगाव मावळ (Wadgaon Maval) हद्दीत बनावट गुटखा तयार करुन त्याची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छपा टाकून पाहणी केली असता, बनावट गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, यंत्र सामग्री, चारचाकीसोबत आरोपी श्रीकांत चांदेकरला रंगेहथ पकडले.

पोलिसांनी चांदेकर याला ताब्यात घेतले असून आज (सोमवार) त्याला वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी (police custody) सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय वडोदे (PSI Vijay Vadode) करीत आहेत. या कारवाईमुळे बनावट गुटखा तयार करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

 

Web Title : Pune Crime | raid factory manufacturing fake gutkha wadgaon mavla 11 lakh worth property confiscated

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Crime News | प्रियकरासोबत पळालेल्या तरुणीवर पोलीस कर्मचाऱ्यानं पोलीस चौकीत बलात्कार केल्याचा आरोप; प्रचंड खळबळ

Pune Crime | कुत्रे अंगावर गेल्याने कारची काच फोडून 44 हजार रूपये चोरले; नवी खडकी परिसरातील घटना

Bluetooth Security | ALERT ! अँड्रॉईड फोन आणि विंडोज 10 यूजर्सला मोठा धोका! समोर आला नवीन प्रकारचा धोकादायक व्हायरस