Online Transfer Software | राज्याच्या आरोग्य विभागाचा नवा उपक्रम; डॉक्टर, कर्मचाऱ्यांची ‘सॉफ्टवेअर’द्वारे होणार बदली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Online Transfer Software | राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने (Government of Maharashtra Health Department) नवीन उपक्रम सुरु केला आहे. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक (Posting) करणे सोपे होणार आहे. आरोग्य विभागाकडून आता पोस्टिंगसाठी तंत्रज्ञानाची (Technology) मदत घेतली जाणार आहे. यामुळे सॉफ्टवेअरच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने (Online Transfer Software) आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक होणार आहे. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर हे ऑनलाईन ट्रान्सफर आणि पोस्टिंग (Transfer And Posting) सुरु करण्यात येत आहे. या सॉफ्टवेअरमध्ये ट्रान्सफर तसेच पोस्टिंगसाठी ज्या कर्मचाऱ्याचा नंबर लागेल त्याचे ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर केले जाणार आहे.

“राज्यातील सर्व ग्रामीण भागात आणि आरोग्य केंद्रांत अनेक डॉक्टर (Doctor) आणि अनेक आरोग्य कर्मचारी (Health Workers) होते, ज्यांची अनेक वर्षांपासून कुठेही बदली झाली नव्हती. त्यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होत होता. ही अडचण दूर करण्यासाठी महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी वर्षानुवर्षे बदली न झालेल्या अशा कर्मचाऱ्यांची ऑनलाइन पद्धतीने (Online Transfer Software) बदली करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात प्रथमच हा नवीन उपक्रम सुरु करण्यात आला असल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाचे आयुक्त धीरज कुमार (Commissioner Dheeraj Kumar) यांनी दिली.

“आम्ही काम करुन एक सॉफ्टवेअर तयार केले आहे.
ज्या कर्मचाऱ्यांची बदली होणार आहे, त्यांना बदलीसाठीचे पर्याय देण्यात आले.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सॉफ्टवेअरने काम केले. कोणाच्याही व्यक्तीच्या हस्तक्षेपाशिवाय कर्मचाऱ्यांची
ऑनलान पद्धतीने बदली झाली,” असे धीरज कुमार यांनी सांगितले.

राज्यातील डॉक्टरांसह आतापर्यंत सुमारे 1 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे ऑनलाइन ट्रान्सफर पोस्टिंग या तंत्रज्ञानाद्वारे करण्यात आले. आयुक्त धीरज कुमार यांनी सांगितले की, दरवर्षी आरोग्य विभागाकडून वर्षाला केवळ 5 ते 7 टक्के बदली करण्यात येत होती. दरम्यान आरोग्य विभागाला तीस टक्क्यांपर्यंत बदल्या करण्यास परवानगी आहे.

Web Title : Online Transfer Software | online transfer of health workers software will do work of posting

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचा पुण्यातील भाव

Petrol-Diesel Price Today | पुणे, मुंबईसह प्रमुख शहरातील आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव काय? जाणून घ्या

Biporjoy Cyclone Update | ‘बिपरजॉय’मुळे गुजरातमध्ये प्रचंड नुकसान! अनेक झाडे कोसळली; 22 लोक जखमी, तर 23 जनावरांचा मृत्यू