SBI च्या कोटयावधी ग्राहकांसाठी खुशखबर ! बँकेनं 14 व्या वेळी कमी केलं व्याजदर, आता कमी होणार तुमचा EMI, जाणून घ्या EMI

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एसबीआयने (स्टेट बँक ऑफ इंडिया) आपल्या ग्राहकांना दिलासा देत कर्जाचे व्याज दर कमी करण्याची घोषणा केली आहे. बँकेने अल्प मुदतीचे एमसीएलआर दर ०.०५ टक्क्यांवरून ०.१० टक्क्यांवर करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयानंतर एसबीआयचा दर ६.६५ टक्क्यांवर आला आहे. एसबीआयचा दावा आहे की, सध्या त्यांचे एमसीएलआर दर देशात सर्वात कमी आहेत. नवीन दर १० जुलैपासून लागू होतील. जूनमध्येही एसबीआयने व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला होता. १० जून रोजी एसबीआयचे एमसीएलआर दर ०.२५ टक्क्यांवरून ७ टक्क्यांवर आले होते. आरबीआयने २२ मे रोजी रेपो दर ०.४० टक्क्यांवरून ४ टक्के केला होता. यानंतर पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया आणि युको बँकेने रेपो आणि एमसीएलआरशी संबंधित त्यांचे व्याजदर आधीच कमी केले आहे.

१ जुलैपासून स्वस्त झाले आहे रेपो लिंक्ड लेन्डिंग रेट आधारित व्याज
एसबीआयने एक्सटर्नल बेंचमार्क लिंक्ड लेन्डिंग रेट (ईबीआर) आणि रेपो लिंक्ड लेन्डिंग रेट (आरएलएलआर) चे दरही कमी केले आहेत.

१ जुलैपासून या दोन्ही दरांमध्ये ०.४० टक्के कपात करण्यात आली आहे. या कपातीनंतर वार्षिक ईबीआर ७.०५ टक्क्यांवरून ६.६५ टक्क्यांवर आला आहे. त्याचप्रमाणे आरएलएलआर ६.६५ टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांवर आला आहे.

३० वर्षांच्या २५ लाखांच्या कर्जावर एमसीएलआर अंतर्गत मासिक हप्त्यात सुमारे ४२१ रुपयांची घट होईल. त्याचप्रमाणे ईबीआर आणि आरएलएलआर अंतर्गत मासिक हप्ता ६६० रुपयांनी कमी करण्यात येणार आहे.

काय आहे एमसीएलआर?
एमसीएलआर असा दर देते, ज्या खाली बँक कर्ज देऊ शकत नाही. अर्थात हे कमी झाल्यामुळे आता बँक कमी दराने कर्ज देऊ शकेल, जेणेकरुन गृह कर्ज ते वाहन कर्जापर्यंतचे सर्व काही तुमच्यासाठी स्वस्त होईल.

परंतु हा लाभ केवळ नवीन ग्राहकांना आणि एप्रिल २०१६ नंतर ज्या ग्राहकांनी कर्ज घेतले आहे त्यांना मिळेल, कारण त्यापूर्वी कर्ज देण्यासाठी किमान दर निश्चित रेट बेस करण्यात आला होता. म्हणजेच बँका यापेक्षा कमी दराने कर्ज देऊ शकत नव्हत्या.