विंग कमांडर अभिनंदन यांना सोडवण्यासाठी PM मोदींनी RAW च्या प्रमुखास दिले होते ‘हे’ आदेश, इम्रान यांचा उडाला होता ‘थरकाप’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बालाकोट एयर स्ट्राइकला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यावेळी भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदची ठिकाणे उद्ध्वस्त केली होती. मात्र, त्याच्या दुसर्‍या दिवशी पाकिस्तानी हवाई दलाने भारतीय ह÷द्दीत येऊन नुकसान करण्याचा प्रयत्न केला होता, जो भारतीय हवाई दलाने उधळून लावला. याच आमने-सामनेच्या लढाईत भारतीय हवाई दलाचे (आयएएफ) फायटर पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पीओकेमध्ये गेले आणि त्यांचे विमान क्रॅश झाले.

मात्र, नंतर पाकिस्तानने वर्धमान यांना सोडले, परंतु यामागील कथा खुपच कमी लोकांना माहिती आहे. जेव्हा वर्धमान यांची रक्तस्त्राव असतानाची छायाचित्रे समोर आली, त्यावेळी तत्कालीन रिसर्च अँड अनालिसिस विंग (रॉ) प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशावर आपले समकक्ष आयएसआयला युद्ध नियमाचे उल्लंघन करण्यासाठी पाकिस्तानला गंभीर परिणाम भोगण्याचा इशारा दिला.

बालाकोट स्ट्राइकच्या एक दिवसानंतर 27 फेब्रुवारीला राजौरी-मेंधर सेक्टरमध्ये नियंत्रण रेशेवर पाकिस्तानी फायटर जेट्सला यशस्वीपणे रोखल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन यांचे मिग-21 बायसनला गोळी मारण्यात आली होती. तत्पूर्वी या वायुसेनेच्या पायलटने जम्मूच्या आकाशात हवाई हल्ल्यात जुने मिग-21 ने चौथ्या पीढीचे एफ-16 लढाऊ विमान पाडले. यानंतर ते पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये क्रॅश झाले, जिथे वर्धमान विमानापासून वेगळे झाले, परंतु त्यांना ग्रामस्थांनी पकडले आणि पाकिस्तानच्या लष्कराकडे सोपवले.

हवाई दलाच्या माजी अधिकार्‍याने सांगितले की, गुप्तचर आणि राजकीय नेत्यांच्या प्रयत्नांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना भारतीय पायलटला सोडावे लागले. अभिनंदन 1 मार्चला वाघा-अटारी सीमा चौकीमार्गे स्वदेशात परतले होते.

मोदींनी रॉ चीफला दिला हा आदेश
पीएम मोदी यांनी भारतीय पायलटची रक्त वाहणारी छायाचित्रे पाहिल्यानंतर भारतीय गुप्तचर प्रमुखांना पाकिस्तानला स्पष्टपणे संवाद साधण्यास सांगितला की, जर अभिनंदनला त्रास झाला तर नवी दिल्ली थांबणार नाही आणि त्याच्या तत्काळ सुटकेची मागणी केली जावी. पाकिस्तानला पीएम मोदींचा संदेश होता की, आमची शस्त्र, दारूगोळा दिवाळीसाठी नाही.

हा संदेश तत्कालीन आयएसआय समकक्ष लेफ्टनंट जनरल सैयद असीम मुनीर अहमद शाह यांना रॉ चे प्रमुख अनिल धस्माना यांनी पोहचवला. धस्माना यांच्या इशार्‍याने आयएसआय प्रमुख सुद्धा हैराण झाले. रॉ प्रमुखांनी त्यांना सांगितले की, इस्लामाबादला परिणाम भोगावे लागतील जर पायलटला स्पर्श केला आणि त्यास परत पाठवले नाही.

भारताने तयार केले बॅलिस्टिक मिसाईल
यासाठी भारताने सशस्त्र दलांना राजस्थान प्रदेशात पृथ्वी बॅलिस्टिक मिसाईल तयार करण्याचा आदेश दिला होता. हे पाहून वॉशिंग्टनने सुद्धा पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा वाजवली होती.

इम्रान यांनी केला होता मोदींशी बोलण्याचा प्रयत्न
28 फेब्रुवारीला नॅशनल असेम्बली मध्ये विंग कमांडर अभिनंदनच्या सुटकेची घोषणा करताना संक्षिप्त वक्तव्यात पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले होते की, पीएम नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण बातचीत होऊ शकली नाही.

आयएसआय प्रमुखाने रॉ चीफला पाठवला होता संदेश
विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेबाबत पीएम इम्रान खान यांच्या घोषणेच्या पूर्वी आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल शाह यांनी 28 फेब्रुवारीला सकाळी आयएएफ पायलटला सोडण्याचा निर्णय कळवत रॉ प्रमुखांना एक संदेश पाठवला होता. ज्याबाबत पीएम मोदी यांना सांगण्यात आले.

काही काळानंतर हटवले गेले आयएसआय चीफ
आयएसआय प्रमुखांना केवळ आठ महिन्यांच्या सेवेनंतर जून 2019 मध्ये आपल्या पदावरून हटवण्यात आले होते आणि त्यांच्या ठिकाणी एक कट्टर लेफ्टनंट जनरल फैज यांना नियुक्त करण्यात आले होते.