ग्रीन झोन असलेल्या उस्मानाबाद मध्ये ‘कोरोना’चे 3 रुग्ण आढळले, जिल्ह्यात प्रचंड खळबळ

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – ग्रीन झोन असणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यात नवीन 3 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एकूण 18 व्यक्तीच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 13 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले, तर कळंब येथील 3 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच 2 व्यक्तीचे अहवाल (Inconclusive) आले असून त्यांची उद्या पुनर्तपासणी करण्यात येणार आहे. 37 दिवसापासून एकही रुग्ण सापडला नव्हता. परंतु गेल्या 5 दिवसात 4 रुग्ण सापडले आहेत. सर्व मुंबई इतर शहरातून आले आहेत, असे सांगण्यात आले आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यात काहीच जिल्हे हे प्रथमपासूनच कोरोनामुक्त राहण्यास यशस्वी ठरले होते. मात्र आता जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला आहे. पूर्वी देखील बाहेरून आलेले 4 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले होते. मात्र त्यांच्यावर उपचारकरून त्यांना कोरोनामुक्त केले होते. त्यानंतर 37 दिवस जिल्हा कोरोनामुक्त होता. दरम्यान मराठवाड्यात लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत कोरोना

चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात मुंबई, पुणे आणि इतर जिल्ह्यतून गावी येत आहेत. त्यामुळे जिल्हा वासीयांचे टेन्शन वाढला आहे. दरम्यान मुंबई येथून दाम्पत्य काही दिवसांपूर्वी आले होते. त्यांना शेतात क्वाराटाईन करण्यात आले होते. मात्र काल अचानक महिलेला त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी दोघांची तपासणी करण्यात आली. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर दुसरा रुग्ण शासकीय कर्मचारी असून तो बाहेर शहरात गेला होता. तो दोन दिवसांपूर्वी परत आला. आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले होते. त्याचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. तिघेही कळंब तालुक्यातील आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण 58 जणांचे अहवाल तपासण्यात आले आहेत. त्यापैकी सर्वच 51 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 4 व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले आहेत, अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर व विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली.