Osmanabad Accident | तिरूपती बालाजीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील भीषण अपघातात 4 जागीच ठार

उस्मानााबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Osmanabad Accident | औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर (Aurangabad-Solapur Highway) कळंब तालुक्यातील येरमाळच्या जवळ भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. मालेगाव मधील भाविक तिरुपती दर्शनाला निघाले असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. या भीषण अपघातात (Osmanabad Accident) 4 जण जागीच ठार झाले असून इतर तिघे जखमी झाले आहेत. ही घटना आज (शुक्रवारी) औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर पहाटे 2 च्या दरम्यान घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मालेगाव येथील 18 भाविक दर्शनासाठी एका ट्रॅव्हल (एम. एच. 41 ए. यु. 1554) मधून तिरुपतीला निघाले होते. शुक्रवारी (23 जुलै) रोजी पहाटे 2 च्या सुमारास त्यांची ट्रॅव्हल येरमाळा नाजिक आली असता पंक्चर झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने गाडी बाजूला घेतली. रस्त्याच्या बाजूला घेऊन पंचर काढण्याचे काम सुरू होते. यादरम्यान काहीजण ट्रॅव्हल मध्ये बसलेले होते. तर बाकीजण ट्रॅव्हलच्या बाहेर थांबले होते. पाठीमागून आलेल्या आयशर टेम्पोने (Eicher Tempo) (M. H. 20- E. G. 5170) उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्सला जोरदार धडक दिली. या जोराच्या धडकेने आयशर टेम्पो पलीकडे शेतात जाऊन पडला. आणि ट्रॅव्हल गाडी देखील रस्त्यापासून लांब अंतरावर फेकली गेली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

या दरम्यान, ट्रॅव्हल (Travel) ही मालेगाव कडून तिरुपतीकडे निघाली होती.
आयशर टेम्पो चालक (Tempo driver) फरार झाला आहे.
मृतांमध्ये शरद विठ्ठलराव देवरे, विलास महादू बचाव, जगदीश दरेकर, सतीश सूर्यवंशी यांचा समावेश आहे.
तर जखमी संजय बाजीराव सावंत, भारत ग्यानदेव पगार, गोकुळ हिरामण शेवाळे यांना उस्मानाबाद येथे पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.

Web Title :-  Osmanabad Accident | accident on aurangabad solapur higway four killed who are going to tirupati balaji

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

KCC-Kisan credit card | शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी ! 2 दिवसात करा ‘हे’ काम, अन्यथा किसान क्रेडिट कार्डमधून कापले जातील पैसे; जाणून घ्या

Aadhaar Virtual Id | प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड घेऊन जाण्याची गरज नाही, मिनिटात बनवा व्हर्च्युअल आयडी आणि करा आवश्यक कामे

Extortion Case Against IPS | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह 6 जणांवर खंडणीचा आणखी एक गुन्हा, 2 कोटींचं प्रकरण