Coronavirus : नुकसान भरपाई करावी चीननं, जर्मनीनं पाठवलं कोटयावधी रूपयांचं ‘बिल’

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिकेच्या पाऊलावर पाऊल टाकत जर्मनीने देखील चीनवर जागतिक साथीचा रोग पसरवल्याचा आरोप करीत 130 अब्ज युरोचे बिल पाठवले आहे. जर्मनीच्या या निर्णयाने चीनमध्ये खळबळ उडाली आहे. एका जर्मन वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, कोरोना महामारीबाबत चीनचे राष्ट्रपति चिनफिंग वर हल्ला केला आहे आणि जगाला या संकटामध्ये टाकण्याचे त्यांना जबाबदार ठरविले आहे.

शनिवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला इशारा दिला की, जर चीनने हे मुद्दाम केले तर त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील. ट्रम्प म्हणाले, ‘जेव्हा हा संसर्ग सुरू झाला तेव्हा ते फक्त चीनमध्येच थांबवता आले असते पण तसे झाले नाही आणि आता संपूर्ण जग त्याच्या तावडीत सापडले आहे.’ ते पुढे म्हणाले की, ‘ जर हे त्यांनी जाणीवपुर्वक केले असेल तर मग त्याचे वाईट परिणाम होतील.’

जर्मनीमध्ये या साथीच्या आजारामुळे होणारे अंदाजे नुकसान 130 अब्ज युरो असल्याचे समजले गेले आहे आणि त्यासंदर्भात संपूर्ण यादी प्रसिद्ध ‘बिल्ड’ या प्रसिद्ध वृत्तपत्रातही प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार, दरडोई एकूण 1784 युरोचे नुकसान झाले आहे आणि देशाच्या जीडीपीमध्येही घट झाली आहे. चीनकडून आलेल्या अहवालांनुसार असे समजते की, त्यांनी या प्राणघातक विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका लपविण्याचा प्रयत्न केला.

डोनाल्ड ट्रम्प सतत आरोप करतात की, त्यांच्या कोणत्याही कामात पारदर्शकता नाही. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, जर्मनीमध्ये कोरोना विषाणूची लागण होण्याची एकूण 141,672 प्रकरणे आहेत, ज्यांना रॉबर्ट कोच इन्स्टिट्यूटने (आरकेआय) सोमवारी जारी केले आहे. या प्रकरणात आतापर्यंत मृतांची संख्या 4,404 आहे.