इस्त्राईलनंतर इटलीच्या वैज्ञानिकांनी केला ‘कोरोना’वरील पहिली ‘लस’ बनवल्याचा ‘दावा’ : रिपोर्ट

रोम :  वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. जगभरातील 190 पेक्षा अधिक देशांमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी जगातील सर्वच देशांकडून यावर लस, औषध तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या दरम्यान इटलीने कोरोना व्हायरसवरील लस तयार करण्यात आली असल्याचा दावा केला आहे. इटलीने केले हा दावा खरा ठरल्यास संपूर्ण जगासाठी ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल. इटलीने दावा करण्यापूर्वी इस्त्राईलने देखील कोरोनावरील लस तयार केल्याचा दावा करताना आम्ही पहिल्यांदा लस बनवली असल्याचे म्हटले आहे.

इटली सरकारने कोरोनावरील अँटीबॉडीज शोधले असल्याचा दावा केला आहे. इटलीतील एका न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार रोममधील स्पायलनजानी रुग्णालयातील लसीवर परिक्षण करण्यात आलं आणि उंदरावर अँटीबॉडीज तयार करण्यात आल्या असून त्याचा परिणाम दिसला असल्याचे सांगण्यात आले आहे. लसीची तपासणी करण्यासाठी वैज्ञानिकांनी उंदराचा वापर केला. संशोधकांनी उंदरावर लसीचं परिक्षण केलं. आणि एकाच लसीकरणानंतर उंदरांनी अँटीबॉडी विकसित केल्या. याचा प्रयोग मानवी पेशींवर करण्यात आला आणि त्याचा परिणाम देखील दिसला असल्याचा दावा करण्यात आला आहे.

रोममधील लजारो स्पालनजानी नॅशनल इस्टिट्यूट फॉर इन्फेक्शन डिसीजच्या संशोधकांनी सांगितले की, ज्यावेळी याचा वापर मानवी पेशींवर केला गेला त्यावेळी व्हायरस मानवी पेशींमध्ये संक्रमित होऊ शकला नाही. त्याच्या वापराने पेशींमध्ये आधी संक्रमित झालेला व्हयरस नष्ट झाला. त्यामुळे मानवी शरीरावरही हे अँटीबॉडीज काम करू शकत असल्याचं सांगण्यात आलं आहे. संशोधकांनी या लसीवरील चाचणी अतिशय प्रगतीपथावर असल्याचे सांगितले आहे. थेट मानवी शरीरावर याची चाचणी उन्हाळ्यानंतर सुरु होऊ शकते अशी माहिती आहे.

दरम्यान, यापूर्वी मंगळवारी इस्त्राईलचे संरक्षण मंत्री बेन्नेट यांनी देखील कोरोना विषाणूवरील अँटीबॉडीज तयार करण्यात आल्याचा दावा केला आहे. बेन्नेट यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्त्रईल इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल रिसर्चने कोरोनावर अँटीबॉडी विकसित करण्यात यश मिळवलं असल्याचं सांगितलं होतं.