Coronavirus Impact : देशव्यापी ‘कोरोना’ कर्फ्यूमुळं वाढलं घरगुती हिंसाचाराचं प्रमाण, महिला दाखल करतायेत ‘तक्रारी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – श्रीलंकेत कोरोना व्हायरसमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आणि कर्फ्यूमुळे घरगुती हिंसेच्या प्रकारात वाढ झाली आहे. राजधानी कोलंबोस्थित नॅशनल रुग्णालयाच्या अपातकाल विभागात दाखल होणाऱ्या प्रकरणांची वाढ झाली आहे. विभागाच्या प्रमुख नर्स पुष्पा डे सोयसा म्हणाल्या शुक्रवारी देशव्यापी कर्फ्यू लावण्यात आल्यानंतर रुग्णालयात येणाऱ्या अनेक महिलांनी घरगुती हिंसाचाराची तक्रार केली आहे. या महिल्यांनी सांगितले आहे की घरात बंद असताना त्यांच्या पतीने त्यांच्याशी गैरव्यवहार केला आणि त्यांना मारहाण केली.

सोमवारी सकाळी संपलेल्या देशव्यापी कर्फ्यूनंतर श्रीलंकेतील अद्यापही 8 जिल्ह्यात आणखी 1 दिवस फर्फ्यू वाढवला आहे. या जिल्ह्यात राजधानी कोलंबोचा समावेश आहे. श्रीलंकेत कोरोना पीडितांची संख्या 82 वर पोहोचली आहे, परंतु अद्याप कोणीही मृत झाल्याची माहिती आलेली नाही.

भारतात कोरोनामुळे 9 लोकांचा मृत्यू –
कोरोना व्हायरस आता संपूर्ण जगासाठी मोठी समस्या बनला आहे. भारतात देखील कोरोना पॉझिटिव्हच्या केस वाढत आहेत. आसाममध्ये कोरोनाचा धोका ओळखून 24 मार्च ते 31 मार्च संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राज्य लॉकडाऊन केले आहे.

महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये आजपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असे असले तरी अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. पश्चिम बंगालमध्ये कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये कोरोनामुळे 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर आता भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 9 वर गेली आहे.