Pune News : खंडणी मागण्याची अनोखी पद्धत, स्पीड पोस्टने 20 लाखाची मागणी, पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात वेगळ्या पद्धतीने खंडणी ( Ransom ) मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 40 वर्षाच्या व्यक्तीला स्पीड पोस्टा ( speed post ) ने पत्र पाठवून ऑनलाइन पद्धतीने 20 लाख जमा करण्यास सांगितले आहेत. पैसे दिले नाही तर कुटुंबीयांना जीवंत सोडणार नाही अशी धमकी स्पीड पोस्टा ( speed post ) ने पत्र पाठवून देण्यात आली आहे.

याशिवाय काही दिवसांपूर्वी बँक खंडणी (Ransom) मॅनेजर विरोधात दिलेली तक्रार मागे घेण्याची मागणी पत्रातून केली आहे.
याप्रकरणी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अन्यथा तुला आणि तुझ्या कुटुंबाला..

तक्रारदार यांनी काही दिवसांपूर्वी एका बँक मॅनेजरच्या विरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. चौकशीमध्ये यामध्ये काहीही तथ्य आढळून आले नाही.
त्यामुळे केवळ अर्ज फाईल करण्यात आला होता.
त्यामुळे संबंधित बँक मॅनेजर विरोधात दिलेली तक्रार मागे घे.
तसेच 20 लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने माझ्या खात्यात जमा कर,
अन्यथा तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना जीवंत सोडणार नाही.
अशी धमकी पत्रातून देण्यात आली आहे.

न्यायालयाच्या आदेशावरुन गुन्हा दाखल

पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात राहणाऱ्या 40 वर्षीय तक्रारदाला 13 मे रोजी हे निनावी पत्र आलं.
हे पत्र स्पीड पोस्टने पाठण्यात आले होते.
या पत्रातून धमकी दिल्याने तक्रारदार यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.
यानंतर न्यायालयाने फिर्यादी यांच्या तक्रीरीची दखल घेत मार्केट यार्ड पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
मात्र हे पत्र नेमकं कोणी पाठवलं, हे अद्याप समजू शकले नाही.
परंतू पोलिसांना बँक मॅनेजरवर संशय आहे.

आरोपीचा शोध सुरु

पोलिसांनी या प्रकरणामध्ये कोणालाही अटक केली नाही.
पोलीस स्पीड पोस्टाने पत्र पाठवणाऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत.
तसेच पत्रातून ज्या बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले आहे.
ते बँक खाते नेमकं कोणाचं आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

READ ALSO THIS :

त्वचा, केसांच्या समस्या सोडवेल ‘विलायची’, जाणून घ्या फायदे

 

RBI MPC : कोरोनामुळे रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही, 4% वर कायम राहणार

एक्सपर्टकडून जाणून घ्या, ‘पॅप’ टेस्टशी संबंधीत महत्वाच्या गोष्टी आणि 21 वर्षानंतर महिलांसाठी ही टेस्ट का आहे आवश्यक

दुर्देवी ! कोरोनामुळं पतीचा मृत्यू झाल्याचा धक्का बसल्याने पत्नीची आत्महत्या

पिंपरी : संशयितांना हटकल्याने केलेल्या दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी