आपला लढा थेट RSS आणि नरेंद्र मोदींशी : सुजात आंबेडकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला असला तरी सुजात आंबेडकर यांनी सरकारला एनआरसी आणि सीएए कायदा मागे घेण्याची मागणी केली आहे. आपला लढा थेट आरएसएस, मोदी आणि अमित शाहांशी असल्याचे बोलताना ते म्हणाले की धर्माच्या आधारावर कोणताही कायदा बनवला जाऊ शकत नाही. यामुळे कलम 14 आणि 15 अंतर्गत येणाऱ्या धर्माच्या आधारे भेदभाव नको या कायद्याचे उल्लंघन होते.

जेव्हा तुम्ही म्हणतात की तुम्ही स्थलांतरितांमध्ये हिंदू, बौद्ध, शीख, इसाई धर्माच्या लोकांना नागरिकत्व देऊ असे सांगतात आणि मुसलमानांचा दूर करतात तेव्हा हे स्पष्ट होतं की हा कायदा मुसलमानांच्या विरोधात आहे.

सुजात आंबेडकर म्हणाले की हा कायदा फक्त मुसलमानांच्या विरोधात नाही तर 40 टक्के मुसलमानांच्या विरोधात देखील आहे. देशात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज आहे त्यांना प्रश्न पडतो की आम्ही कागद कुठून दाखवावी. त्यामुळे देशातील वंचितांसमोरील प्रश्न आहे की आम्ही कागद दाखवू कुठून.

राज्यात बंद शांतपणे पार पडला आहे. बंद शांततेत झाला पाहिजे. आपला लढा थेट आरएसएस, मोदी आणि अमित शाहांशी आहे असे ही सुजात आंबेडकर म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like