कांदिवली येथे घडलेल्या ‘या’ घटनेत २३ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ती पाहत होती भावी आयुष्याची सुंदर स्वप्ने १४ मार्च रोजी होणार होती तिची बिदाई पण नियतीला काही वेगळं मंजूर होत.आणि तीच हे सुंदर  स्वप्न पूर्ण होण्या आधीच काळाने तिच्यावर घाला घातला.  हो असाच काहीसा प्रकार कांदिवली पश्चिमेत घडला आहे .जयदीप इन्टरप्राईज या प्लायवूड दुकानातील अतिभार झालेल्या प्लायवूडची साखळी तुटून २३  वर्षीय सोनम यादव या तरुणीचा मृत्यू झाला आहे . सोनम हिची १४ मार्च रोजी तिची बिदाई होणार होती; परंतु त्याआधीच तिचा मृृत्यु झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अशी घडली घटना 
कांदिवली पश्चिमेकडील चारकोप-गणेश चौकाजवळ जयदीप इंटरप्राइजेस हे दुकान आहे. या दुकानात लोखंडी कप्प्यात मोठ्या प्रमाणात प्लायवूड, सिरॅमिक ठेवण्यात आले होते. या कप्प्यावर अतिभार झाल्याने शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास  प्लायवूड कोसळले. साधारणतः २० टनांच्या त्या ढिगार्‍याखाली सोनम यादव ही तरुणी सापडली. त्यावेळी ती जोरजोरात ओरडत होती. ही माहिती रक्ताने माखलेल्या एका कामगाराने बाहेर येऊन शेजार्‍यांना सांगितली.
उपचारापूर्वी झाला होता मृत्यू 
घटनेची माहिती मिळताच  दुकानाचा मालक घटना स्थळी आला. त्याने इतरांच्या मदतीने प्लायवूड काढण्याचे प्रयत्न केले, परंतु त्यांना अपयश आले नंतर त्यांनी पोलीस व अग्निशामक दलास बोलावले .या घटनेचं गांभीर्य  पाहून त्यांनी  क्रेन मागविली. अखेर क्रेन व जेसीबीच्या साहाय्याने प्लायवूडचा भाग  कटिंग करून  ४ तासांच्या प्रयत्नानंतर सोनमला प्लायवूडच्या ढिगार्‍यातून बाहेर काढण्यात आले. मात्र, कांदिवलीच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नेण्याआधीच तिचा मृृत्यु झाला होता.
याप्रकरणी चारकोप पोलिसांनी दुकान मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तर पालिका उपायुक्त अशोक खैरे यांनी नियमानुसार कारवाई करणार असल्याची माहिती दिली.