पुणे शहरात रात्रभर संततधार पाऊस, संपूर्ण जिल्ह्यात सर्वदूर पावसाची जोरदार हजेरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात गेल्या २४ तासात एक महिना पुरेल इतका पाणीसाठा एका रात्रीत झाला आहे. शनिवारी सकाळी चार धरणातील पाणीसाठा १६.७४ टीएमसी झाला आहे. पुणे शहरात गेल्या २४ तासात ७८ मिमी पावसाची नोंद झाली असून या हंगामातील ही एका दिवसात पडलेला हा सर्वाधिक पाऊस आहे.

गेल्या २४ तासात खडकवासला धरण परिसरात ७६ मिमी, पानशेत धरणात १४७ मिमी, वरसगाव धरणात १४५ मिमी आणि टेमघर धरणात १७० मिमी पाऊस झाला आहे. मुळशी धरणात गेल्या २४ तासात २०४ मिमी पाऊस झाला असून ५६ टक्के धरण भरले आहे. मावळातील आंद्रा धरणात १५३ मिमी पाऊस झाला असून धरण १०० टक्के भरले आहे. वडिवळे धरणात १९५ मिमी, कळमोडी धरणात १५० मिमी, भामा आसखेड ११६ मिमी, गुंजवणी धरणात १५८ मिमी पाऊस झाला आहे.

संपूर्ण जिल्ह्यात पावसाचा जोर असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –