सुषमा स्वराज यांचे पार्थिव पाहून भावूक झाले ‘MDH’ मसालेचे मालक, ‘अश्रू’ झाले अनावर (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी वयाच्या ६७ व्या वर्षी हद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज अंत्यसंस्कारासाठी सुषमा स्वराज यांचे पार्थिव भाजप मुख्यालयाच्या लोधी रोड स्थित स्मशानभूमीत नेण्यात आले. राजनाथ सिंह, रविशंकर प्रसाद, पीयूष गोयल आणि जेपी नड्डा यांनी सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाला खांदा दिला. यावेळी अनेक दिग्गज नेत्यांनी आणि विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.

एमडीएच मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी भावूक
या दुखद प्रसंगी एमडीएच मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांनी सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यावेळी ते अत्यंत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले. सध्या त्यांचा हा भावूक झालेला व्हिडिओ व्हायरल होत आहे.

प्रसंगी पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्यासह भाजपचे इतर नेते उपस्थित होते. सुषमा स्वराज यांच्या मुलीने म्हणजेच बासुरीने सुषमा स्वराज यांना मुखाग्नी दिली. त्यानंतर विद्युत दाहिनीत त्यांची अंत्यसंस्कार प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

कलम ३७० रद्द झाल्यानंतर ट्विटरच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांनी आनंद व्यक्त केला. याबाबतचे ट्विट त्यांना केले होते. सुषमा स्वराज यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी तयार झाली आहे. त्यांची कारकिर्द कायमच प्रेरणादायी ठरेल.

आरोग्यविषयक वृत्त –