नाशिक दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा प्रभाव अधिक वाढला आहे. अशातच ऑक्सिजनचा तुडवडाही अधिक भासत आहे. यामध्येच नाशिक मध्ये घडलेली अत्यंत दुर्देवी घटना धक्का देऊन जाते. येथील महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयाच्या टाकीला दुपारी गळती सुरु झाल्याने ऑक्सिजन अभावी २२ जण दगावले आहेत. या दुर्घटनेबद्दल राज्याचे मुख्यंमत्री सहित अनेक सत्ताधारी आणि विरोधक नेत्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच यामधील मृतांच्या वारसांना ५ लाखाची मदत देणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

नाशिक येथील झालेल्या घटनेवरून राज्यातून दुःख व्यक्त केलं जात आहे. यासाठी आता रुग्णालयात मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला ५ लाखाचे सहकार्य केलं जाणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच येथील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेमुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला आहे. यासाठी आता आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहे. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे संध्याकाळी सहा वाजता रुग्णालयाला भेट देणार आहेत. तर टोपे म्हणाले, संपूर्ण घटनेची माहिती घेत असून लवकरच सर्वकाही स्पष्ट होणार आहे.

या दरम्यान महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात नेमका हा प्रकार घडला कसा याची चोकशी सुरु करण्यात  येणार आहे. मात्र, ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेनंतर रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संताप दिसून आला. तसेच या प्रकरणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.