‘या’ कारणांमुळं मिळाली पी. चिदंबरम यांना 5 दिवसांची कोठडी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयएनक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना आज पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली. सीबीआयच्या राऊज अ‍ॅव्हेन्यू कोर्टाने हा निर्णय दिला आहे. दरम्यान चिदंबरम यांच्या वकिलांना आणि त्यांच्या घरच्यांना भेटण्यासाठी रोज अर्धा तासाचा अवधी न्यायालयाने दिला आहे.

काय झाले न्यायालयात
काल चिदंबरम यांना ताब्यात घेतल्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. चिदंबरम हे चौकशीला सहकार्य़ करत नसल्याने त्यांच्या चौकशीसाठी त्यांना पाच दिवसांची कोठडी देण्यात यावी अशी मागणी सीबीआयने कोर्टात केली. तसेच आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी चिदंबरम यांची चौकशी करायची असल्याचंही सीबीआयने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.

सीबीआयचा युक्तीवाद
सीबीआयचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी चिदंबरम यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग केल्याचा दावा केला. आयएनएक्स मीडियाने चुकीच्या पद्धतीने एफडीआय वसुली केली. एफआयपीबीच्या नियमांचे उल्लंघन करून ही वसुली करण्यात आली. त्यामुळे आयएनएक्सला फायदा मिळाला. त्यामुळे या कंपनीने इतर कंपन्यांनाही पैसे दिले, असे मेहता यांनी सांगितले. मौन पाळणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र जाणूनबुजून प्रश्नांची उत्तर देण्याचे टाळणं हे चुकीचे आहे. त्यांमुळे चौकशी पूर्ण करण्यासाठीच चिदंबरम यांना कोठडी मिळणे गरजेचे असल्याचे तुषार मेहता यांनी युक्तीवाद केला.

पी. चिदंबरम यांच्या वकीलांचा युक्तीवाद
कपिल सिब्बल यांनी पी. चिदंबरम यांची बाजू मांडताना या प्रकरणात कार्ती चिदंबरम दोषी असल्यामुळे पी. चिदंबरम यांना अटक करण्यात आली आहे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कार्ती चिदंबरम यांना उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही जामीन नाकारला नाही. याच प्रकरणातील इतर आरोपींनाही जामीन देण्यात आला आहे. त्यामुळे पी. चिदंबरम यांना देखील जामीन मिळाला पाहिजे असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला. तब्बल अडीच तास चालेल्या दोन्ही बाजूंच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर चिदंबरम यांची २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडीत रवानगी केली.

आरोग्यविषयक वृत्त –