पी.चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ ! SC नं जामीन अर्ज फेटाळला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणात पी. चिदंबरम यांना अग्रिम जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दर्शविला असून त्यांची याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. म्हणजेच आता अंमलबजावणी संचालनालय (ईडी) पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेऊ शकते. सुप्रीम कोर्टाचे म्हणणे आहे की ही एजन्सी माजी अर्थमंत्र्यांना ताब्यात घेऊन चौकशी करू शकते. पी. चिदंबरम यांची सीबीआय कोठडी आज संपली.

सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात आदेश दिला आहे की, ईडीने कोणती कागदपत्रे जमा केली आहेत, त्यांना पी. चिदंबरम यांना दाखविण्याची गरज नाही. तसेच एजन्सीला माजी अर्थमंत्री यांनी विचारलेल्या प्रश्नांची प्रतिलिपी कोर्टाला देण्याची गरज नाही. गुरुवारी ईडी माजी अर्थमंत्र्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करू शकते.

सुप्रीम कोर्टाचे म्हणणे आहे की, सुरवातीला अंतरिम जामीन मंजूर केल्याने तपासात अडथळा निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत अंतरिम जामीन मंजूर करणे योग्य नाही. आर्थिक गुन्हेगारासोबत जरा वेगळ्या पद्धतीने वागले पाहिजे.

आयएनएक्स मीडिया प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम अजूनही केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) च्या ताब्यात आहेत. अंतरिम जामीन आणि सीबीआय कोठडीप्रकरणी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. कोर्टाने आपला निकाल वाचत म्हटले आहे की एजन्सीच्या वतीने केस डायरी कोर्टात सादर करता येईल.

माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची पत्नी नलिनी चिदंबरम, मुले कार्ती चिदंबरम, वकील अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल हे सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान उपस्थित होते.

पी. चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात सीबीआय कोठडीला विरोध दर्शविला होता, तथापि राऊस A व्हेन्यू कोर्टाने पी. चिदंबरम यांना सीबीआय कोठडीत 5 सप्टेंबरपर्यंत पाठविले. पी. चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी सीबीआयने अटक केली होती.

सीबीआय कोठडी 5 सप्टेंबर रोजी संपत आहे. म्हणजेच, सीबीआयला पी. चिदंबरम यांची कोठडी कोर्टाकडून मिळाली नाही किंवा त्यांच्या बाजूने काही मागणी नसेल तर ईडी या प्रकरणात चौकशीसाठी पी. चिदंबरम यांना त्वरित अटक करू शकते.

विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सीबीआयच्या वतीने असे सांगितले गेले होते की त्यांना पी. चिदंबरम यांची पुढील कोठडी नको आहे, अशा परिस्थितीत त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवावे. पी. चिदंबरम यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यास त्यांना तिहार तुरुंगात जावे लागेल. मात्र, कपिल सिब्बलच्या वतीने याला विरोध झाला, त्यानंतर कोर्टाने 5 सप्टेंबरपर्यंत कोठडीत वाढ करण्याचे आदेश दिले होते.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like