पी. चिदंबरम यांच्या भ्रष्टाचाराचा मोठा ‘खुलासा’, ट्रस्टच्या माध्यमातून ‘लाच’ घेतल्याचा संशय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याविषयीची महत्वाची कागदपत्रे ईडीने सीबीआयच्या हवाली केली असून त्यात त्यांनी ट्रस्टच्या माध्यमातून लाच घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

सध्या पी. चिदंबरम हे सीबीआयच्या कोठडीत ३० ऑगस्टपर्यंत आहेत. ते विविध व्यवहाराबाबतची माहिती त्यांच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. पी. चिदंबरम हे पलानीएप्पा चेटियर ट्रस्टचे विश्वस्त आहेत. या ट्रस्टला नार्थस्टार या कंपनीने ३३ लाख रुपये देणगी दिली होती.

विशेष म्हणजे ज्या आयएनएक्स कंपनीवरुन चिदंबरम यांना अटक करण्यात आली आहे. त्या आयएनएक्स कंपनीने २६ सप्टेंबर २००८ रोजी नार्थस्टार कंपनीला ६० लाख रुपये दिले होते. त्यानंतर नार्थस्टार कंपनीने चिदंबरम विश्वस्त असलेल्या पलानीएप्पा ट्रस्टला सुरुवातीला ३३ लाख रुपयांची देणगी दिली होती. या ट्रस्टबाबत सीबीआयने चिदंबरम यांच्याकडे चौकशी सुरु केली आहे.

आयएनएक्स कंपनीकडून नार्थस्टार, नार्थस्टारकडून पलानीएप्पा ट्रस्ट व ट्रस्टकडून चिदंबरम यांच्याकडे हा पैसा गेल्याचा सीबीआयला संशय आहे. चिदंबरम यांची संपत्ती १२ देशात पसरली असून त्यांची परदेशात १७ बेनामी खाती असल्याचा ई डीचा दावा आहे. त्यासंबंधी आपल्याकडे आवश्यक ते पुरावे आहेत. शेल कंपन्या चालविणारे अनेक जण चिदंबरम यांच्या संपर्कात असल्याचे ई डीचे म्हणणे आहे.

आरोग्यविषयक वृत्त –