‘PACL चिटफंड’ मध्ये अडकलेले पैसे परत मिळविण्यासाठी उरले शेवटचे काही दिवसच, जाणून घ्या प्रकिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PACL चिटफंड मध्ये पैसे अडकलेल्या नागरिकांसाठी एक दिलासा देणारी गोष्ट समोर आली आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने यासाठी नवीन वेबसाईट तयार केली आहे. यावर जाऊन तुम्ही यासाठी तुमचा फॉर्म भरू शकता. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरून या संबंधित सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावी लागतील. यासाठी ३१ जुलैपर्यंतच तुम्हाला अर्ज करता येणार आहे. http://sebipaclrefund.co.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. पुढील पद्धतीने तुम्ही अर्ज करून पैसे मिळवू शकता.

१) सर्व कागदपत्र अपलोड करणे

या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता, संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर या संबंधीचे संपूर्ण कागदपत्र याठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहेत. यासाठी तुम्ही तुमची सर्व कागदपत्रे स्कॅन करून घेणे गरजेचे आहे. जर तुमच्याजवळ पैसे भरल्याची मूळ कागदपत्र नसतील तर घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. तुम्ही पैसे भरल्याची पावती देखील अपलोड करू शकता.

२) पॅनकार्ड आणि बँक खाते

यासाठी तुमच्याकडे पॅनकार्ड आणि बँक खाते असणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे यातील काहीही नसेल तर तुम्हाला पैसे परत मिळणार नाहीत.

३) कधी मिळणार पैसे

या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागण्याची शक्यता आहे. सर्व अर्ज आल्यानंतर त्यांची छाननी करून सेबीकडे असलेल्या निधीतून कशाप्रकारे नागरिकांनी त्यांचे पैसे परत देण्यात येतील. यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पैसे कधी दिले जाणार याची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक