भारताला ‘स्वस्त’ मीठ विकत पाकिस्तान?, ‘सवाल-जबाब’ वाढल्यानं दिलं स्पष्टीकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या पेट्रोलियम विषयांवरील स्थायी समितीला पीएडीसीच्या माहनिदेशकांनी भारत आणि पाकिस्तानमधील मीठाच्या करारावरून एक खुलासा केला आहे. यात समितीला सांगण्यात आले आहे की, भारत आणि पाकिस्तानमध्ये असा कोणताही करार झालेला नाही. ज्यात पाकिस्तानने भारताला कमी किमतीत मीठाची विक्री करणे अनिवार्य असेल. ‘द नेशन’ने दिलेल्या वृत्तानुसार ही माहिती समोर आली आहे.

पीएडीसीच्या महानिदेशकांनी सांगितल्यानुसार भारताला कमी किमतीत मीठ देण्याबाबत येणाऱ्या सुचना खोट्या आहेत. पाकिस्तान आणि भारतात असा कोणताही करार झालेला नाही. तसंच पाकिस्तान भारताला कमी किमतीत मीठ विकण्यासाठी बांधील आहे. असंही कुठे लिहीलेले नाही. त्यामुळे सोशल मीडियावर भारतात मीठ निर्यातीबाबत येणारी माहिती चूकीची आहे, असं स्पष्ट करण्यात आले आहे.

पाकिस्तानचे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये स्वतःचे असे कोणतेही ब्रँड नाही. भारताने मात्र आपल्या मीठाची चांगली ब्रँडींग केली आहे. तसंच ते पाकिस्तानी मीठ बाजारात चांगल्या किमतीत विकतात. असंही पीएडीसीच्या महानिदेशांकानी सांगितले.

दरम्यान, पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या मीठाची किंमतीत २०० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. भारत मोठ्या प्रमाणात पाकिस्तानमधून मीठ आयात करते. ज्यात लाहोरी सैंधव मीठाची भारतातून अधिक मागणी होते, अशीही माहिती देण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –