पाक PM इम्रान खान यांच्याकडून नरेंद्र मोदींना फोनद्वारे शुभेच्छा ; व्यक्त केली ‘ही’ अपेक्षा

वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढवलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॉलिवूड कलाकार इतकेच काय मोदींचे विरोधकही मोदींना शुभेच्छा देत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच इम्रान खान यांनी ट्विटरवरून मोदींना शुभेच्छा दिल्या होत्या. आता फोनवरून देखील इम्रान खान यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

फोनवरून झालेल्या संभाषणात इम्रान खान यांनी सांगितले की, दोन्ही देशात विश्वासपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी, शांततापूर्ण वातावरणर्मितीसाठी आणि दहशतवाचा सामना करण्यासाठी एकमेकांचे सहकार्य गरजेचे आहे. दक्षिण आशियाई क्षेत्रात शांतता, प्रगती आणि बंधुभाव वाढवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू.

२३ मे रोजी इम्रान खान यांनी ट्विटरवरून दिलेल्या शुभेच्छांमध्ये म्हणले की, भाजप आणि इतर मित्र पक्षांना लोकसभा निवडणुकीतील मिळालेल्या विजयाबद्दल नरेंद्र मोदींचे अभिनंदन. नरेंद्र मोदी यांच्यासोबत दक्षिण आशियाई क्षेत्रात शांतता, प्रगती आणि बंधुभाव वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.