दुबईमध्ये भारतीय मुलीसाठी ‘हिरो’ बनला पाकिस्तानी ड्रायव्हर, सर्वत्र होतय ‘गुणगान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दुबईमध्ये गेलेल्या एका भारतीय मुलीसाठी एक पाकिस्तानी ड्राइव्हर हिरो ठरला आहे आणि या गोष्टीला सोशल मीडियावर चांगलीच वाह वाहा मिळत असून नेटकऱ्यांकडून या मुलाचे कौतुकही केले जात आहे. झाले असे की, दुबईला गेलेल्या एका भारतीय मुलीची पर्स हरवली ज्यामध्ये तिचा विद्यार्थी व्हिजा आणि काही महत्वाची कागदपत्रे होती. रैशेल रोज असे या मुलीचे नाव असून थंडीच्या दिवसांमध्ये ती दुबई फिरण्यासाठी आली होती आणि 4 जानेवारीला तिची पर्स तिच्याकडून हरवली.

ज्या वेळी ही घटना घडली त्यावेळी रोज आपल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमासाठी निघाली होती. रैशेलच्या आईने सांगितले की, 4 जानेवारीच्या सायंकाळी 7.30 वाजता तिने आपल्या मैत्रिणीसोबत प्रवास करण्यासाठी टॅक्सी केली होती. तेव्हा तिने तिच्या एका मैत्रिणीला दुसऱ्या कारमध्ये पाहिले आणि तिच्यासोबत जाण्यासाठी कार बदलली. मात्र या गडबडीमध्ये रैशेल आपली पर्स तेथेच विसरली.

तिच्या पर्समध्ये युके स्टे परमिट कार्ड व्यतिरिक्त, आयडी, ड्रायविंग लायसन्स, आरोग्य कार्ड, क्रेडिट कार्ड आणि 1 हजारांपेक्षा अधिक दिरम होते. कॅब चालक असलेल्या खादीमने आपल्या कारमध्ये पर्स पाहिली असता त्यातील कार्डवरील माहितीनुसार त्याने ती पर्स त्यासंबंधित पत्त्यावर पोहचवली. आणि अशाप्रकारे तो एका भारतीय मुलींसाठी हिरो ठरला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like