पाकिस्तानातील ऐतिहासिक हनुमान मंदिरात उत्खणनादरम्यान 1500 वर्ष जुन्या ‘अँटिक’ मूर्त्या सापडल्या, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानमधील कराची येथील ऐतिहासिक हनुमान मंदिराच्या नूतनीकरणाच्या कामादरम्यान बरीच मौल्यवान शिल्पे आणि कलाकृती समोर आल्या आहेत. या शोधामुळे मंदिराच्या बांधकाम कालावधीचा मागोवा घेण्यास मदत होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

कराचीमधील जुने सोल्जर बाजार भागातील श्री पंचमुखी हनुमान मंदिराचे विश्वस्त श्री रामनाथ महाराज यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी या मंदिराच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाले तेव्हा या सर्व गोष्टी सापडल्या. ते म्हणाले, “सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आम्हाला जास्त खोदण्याची गरज नव्हती. आम्ही फक्त दोन किंवा तीन फूट खोदले आणि या मूर्ती सापडल्या. ”

या कलाकृतींमध्ये हनुमानाचे आठ-नऊ पुतळे, म्हशीच्या आकाराचे पुतळे, गणेश मूर्ती, शेरावली माता पुतळे आणि मातीच्या काही भांड्यांचा समावेश आहे. एका मुलाखतीत अखिल पाकिस्तान हिंदू पंचायतचे सरचिटणीस रवी दावनी म्हणाले की मंदिराच्या जागेवरुन अनेक शिल्पे आणि कलाकृती सापडल्या आहेत.

ते म्हणाले की, या कलाकृतींमुळे मंदिराचा बांधकाम कालावधी निश्चित करण्यास मदत होईल. असे म्हणतात की हे मंदिर 1500 वर्षांहून अधिक जुने आहे. हिंदूंमध्ये त्याचे मोठे महत्त्व आहे. दावनी म्हणाले की हिंदूंना असा विश्वास आहे की वनवासात असताना भगवान श्री राम या मंदिरात आले होते.

आरोग्यविषयक वृत्त –