कुलभूषण जाधवांना आज भारतीय दूतावासाची मदत !

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – हेरगिरी आरोपावरून पाकिस्तानच्या लष्करी न्यायायाकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना आज सोमवारी भारतीय दूतावासाची मदत मिळणार आहे. कुभूषण यांना आज भारतीय दूतावास अधिकाऱ्यांना भेटू देण्यात येणार असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते महंमद फैजल यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिएन्ना करारानुसार कुलभूषण जाधव यांना भारतीय अधिकाऱ्यांना भेटू दिले जाणार आहे. याआधीही पाकिस्तानने भारतीय अधिकाऱ्यांना भेटण्याची परवानगी दिली होती. परंतु यात पाकिस्तानने काही अडथळे निर्माण केले होते. त्यामुळे ही भेट नाकारली. भारताने पाकिस्तानला सांगितले कि, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार कोणत्याही अटींशिवाय दूतावासाची मदत मिळवून देण्यात यावी.

पाकिस्तानने जाधव आणि भारतीय अधिकाऱ्यांची भेट करुन देण्यास परवानगी दिली आहे. तरी कुलभूषण जाधव यांना दूतावासाच्या भेटी वेळी पाकचा एक अधिकारी उपस्थित राहील, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील. भेटीच्या ठिकाणी, जाधव आणि भारतीय अधिकारी यांच्यात होणारी चर्चा रेकॉर्ड केली जाईल, अशा अटी लादल्या आहेत. परंतु भारताने या अटी मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला होता. असे देखील महंमद फैजल यांनी सांगितले.

दरम्यान, पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपांखाली फाशीची शिक्षा सुनावली आहे. भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतल्याने जाधव यांच्या शिक्षेला स्थगिती मि‌ळाली होती. न्यायालयाने १७ जुलै रोजी दिलेल्या आदेशानुसार, जाधव यांच्या खटल्याचा आणि शिक्षेचा आढावा घेऊन या प्रकरणी पाकिस्तानने फेरविचार करावा आणि त्यांना विनाविलंब भारतीय दूतावासाची मदत देण्यात यावी,’ असे सांगितले होते. त्यावरून पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या भेटी संदर्भात माहिती दिली.

आरोग्यविषयक वृत्त