Pakistan Floods 2022 | पाकिस्तानात पुरामध्ये 1300 जणांचा मृत्यू, 5,00,000 लोक स्थलांतरित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Pakistan Floods 2022 | सध्या पाकिस्तानमध्ये निसर्गाचा प्रचंड प्रकोप सुरू आहे. येथे आलेल्या पुरात आतापर्यंत 1300 नागरिकांचा बळी गेला असून अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अगोदरच महागाई आणि बेरोजगारीने त्रस्त असलेल्या लोकांचे यामुळे जगणे धोक्यात आले आहे. दरम्यान पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. मागील 24 तासात पुरामुळे 24 जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानातील बलुचिस्तान, खैबर पख्तुन्वासह दक्षिणेतील सिंध प्रांत पाण्याखाली गेला आहे. (Pakistan Floods 2022)

 

पाकिस्तानच्या जियो न्यूजच्या वृत्तानुसार, सिंध प्रांतात 180, खैबर पख्तुन्वामध्ये 138 तर बलुचिस्तानमध्ये 125 जणांचा पुरामुळे मृत्यू झाला आहे. या पुरामुळे 14 लाखांपेक्षा जास्त घरांचे नुकसान झाले. तसेच जवळपास 7 लाखांहून जास्त प्राणी दगावले आहेत. या संकटात जगातील अनेक देशांकडून पाकिस्तानला मदत केली जात आहे. (Pakistan Floods 2022)

 

पााकिस्तानला पुराच्या संकटातून सावरण्यासाठी फ्रान्सने एका विशेष विमानातून शनिवारी मदत पाठवली. आंतरराष्ट्रीय संस्थांकडून पाकिस्तानातील नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या पुरामुळे तब्बल 10 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (Flood In Pakistan)

 

पाकिस्तान सरकारमधील मंत्री शाझिया मर्री यांनी सांगितले की, पुरामुळे नुकसान झालेल्या 7 लाख 23 हजार कुटुंबांना 25 हजारांची रोख मदत करण्यात आली आहे. ‘बेनझीर इन्कम सपोर्ट प्रोग्राम’ अंतर्गत पीडितांना मदत केली जात आहे.

 

बलुचिस्तान, खैबर पख्तुन्वा आणि सिंध प्रांतातील सुमारे 5 लाख लोक तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या छावण्यांमध्ये राहत आहेत.
या पुराने पाकिस्तानचा एक तृतियांश भाग व्यापला आहे. यामुळे जवळपास 33 लाख लोकांना आर्थिक फटका बसला आहे.

 

Web Title :- Pakistan Floods 2022 | flood in pakistan caused 1300 deaths 5 lakhs people displaced

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा; राजकीय चढाओढीत एकमेकांवर आरोपप्रत्यारोप

 

Pune News | बांधकाम व्यावसायीकाच्या फायद्यासाठी झोपडपट्टीतील कुटुंबाना आगीतून फुफाट्यात जाण्याची भिती

 

Maharashtra Political Crisis | CM एकनाथ शिंदेंसमोर नारायण राणेंचे सूचक विधान; म्हणाले – ‘शिल्लक राहिलेली काँग्रेस आम्ही वाटून घेऊ’