Pune News | बांधकाम व्यावसायीकाच्या फायद्यासाठी झोपडपट्टीतील कुटुंबाना आगीतून फुफाट्यात जाण्याची भिती

हिलटॉप हिलस्लोपवरील 3 गुंठयामध्ये बेकायदा बांधलेल्या 5 मजली इमारतीमध्ये आनंदनगर येथील तब्बल 25 कुटुंबियांचे पुनर्वसन

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | बिबवेवाडी येथील गंगाधाम चौकालगत (Gangadham Chowk, Bibvewadi) असलेल्या आनंदनगर वसाहत (Anand Nagar Vasahat) झोपडपट्टीतील नागरिकांचे पुनर्वसन (Rehabilitation) मागेच असलेल्या हिलटॉप हिलस्लोपवर (Hilltop on Hillslope) पाच मजली इमारत बांधून त्याठिकाणी करण्यात आले आहे. हिलटॉप हिलस्लोपची जागा असल्याने येथे बांधकामाला परवानगी नाही. मात्र, यानंतरही येथील तीन गुंठे जागेत पाच मजली इमारत उभारून २५ कुटुंबाना ५०० चौ.फुटाच्या सदनिका देण्यात आल्या आहेत. जागेची मालकी या कुटुंबियांच्या नावे केली असली तरी सदनिका नावावर होणार? मिळकत कराची (PMC Property Tax) आकारणी होणार? कर्ज प्रकरण होणार? असे अनेक प्रश्‍न येथील नागरिकांपुढे आहेत. (Pune News)

 

आनंदनगर झोपडपट्टीच्या मागील बाजूस ‘सॉलीटेअर’ या बांधकाम कंपनीचे (Solitaire Construction Company) काम सुरू आहे. रस्त्याच्या कडेला असलेली ही झोपडपट्टी हटविण्याचे प्रयत्न मागील काही काळापासून सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात येथील ८० कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी संबधित बिल्डरने पुढाकार घेतला आहे. हा पुढाकार घेताना मात्र, येथील झोपडपट्टी वासियांचे पुनर्वसन येथून एक किलोमीटरभर मागे डोंगरावर ‘हिलटॉप व हिलस्लोप’ म्हणून आरक्षित जागेवर उभारण्यात आलेल्या इमारतीत करण्यात आले आहे.  हिलटॉप व हिलस्लोपवर बांधकामांना परवानगी नसताना या परिसरात मोठ्याप्रमाणावर बांधकामे झाली आहेत.

 

विशेष असे की कृष्णा संपत पवार या व्यक्तिच्या नावे बिबवेवाडी सि.स.नं. ४९४ मध्ये असलेल्या तीन गुंठयाच्या प्लॉटवर पाच मजली इमारत बांधण्यात आली आहे. मागील महिन्यातच इमारतीची जागा येथे पुनर्वसन करण्यात आलेल्या आनंदननगर येथील २५ कुटुंबियांच्या नावे करण्यात आली आहे. इमारतीचे बांधकाम कोणत्या बांधकाम व्यावसायीकाने केले आहे, याची येथील नागरिकांना माहिती नाही. तसेच या घराच्या बदल्यात नागरिकांकडून एकही रुपया घेण्यात आलेला नाही. तूर्तास तरी इमारतीला एकच कॉमन मिटर असून पाणी पुरवठा ही सुरळीत आहेत. अद्यापही काही किरकोळ कामे राहीली असल्याचे दिसून येते. (Pune News)

झोपडीपेक्षा प्रशस्त सदनिका मिळाली असली तरी इमारतीची जागा नावावर असली तरी सदनिका नावावर होणार? महापलिकेकडून मिळकत कराची आकारणी होणार ? भविष्यात कुठल्या अडचणी येणार ? असे अनेक प्रश्‍न येथील नागरिकांना पडले आहेत. येथूनच जवळच आणखी एक इमारत असून तेथेही काहीजणांचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे.

 

पुनर्वसनासंबधांत उपस्थित होत असलेले प्रश्‍न:

हिलटॉप हिलस्लोपमध्ये झोपडपट्टीवासियांच्या नावे तीन गुंठे जागा लिहून देणार्‍या जागा मालकाचा पुनर्वसन प्रक्रियेशी संबध काय?

इमारतीचे बेकायदा बांधकाम करणारा बांधकाम व्यावसायीक कोण?

झोपडपट्टी पुनर्वसन करण्यामध्ये महापालिका प्रशासनाची भुमिका काय?

बांधकाम व्यावसायीकाने पुनर्वसन केले असेल तर भाजपच्या स्थानीक लोकप्रतिनिधींनी समन्वयाची भुमिका कशासाठी घेतली?

हिलटॉप हिलस्लोपवरील गोदामे व बांधकामांविरोधात कडक कारवाईची घोषणा करणारी महापालिका प्रशासन मूग गिळून गप्प?

बिल्डरच्या सांगण्यावरून भाजपच्या लोकप्रतिनिधींची आनंदननगर झोपडपट्टीतील नागरिकांवर गुंडगिरी; गुन्हा दाखल करण्याची पोलिस आयुक्तांकडे मागणी – प्रशांत जगताप

बिल्डरच्या सांगण्यावरून भाजपचे आमदार (BJP MLA) आणि स्थानीक नगरसेवकांनी (BJP Local Corporator) आनंदनगर वसाहतीतील झोपडपट्टी हटविण्यासाठी झोपडपट्टीतील नागरिकांना शिवीगाळ व मारहाण केली. आनंदनगर झोपडपट्टीमध्ये सुरू असलेला प्रकार हा बिहार स्टाईल गुंडगिरीचा प्रकार आहे. येथील रहिवाश्यांना पुनर्वसन करण्याचे आमिष दाखवून दिलेली  हिल – टॉप भागातील  जागा देखील अनधिकृत असून त्या  सदनिकांमध्ये स्थलांतर करण्यास स्थानिकांचा विरोध आहे. हा विरोध मोडून काढण्यासाठी स्थानिक भारतीय जनता पक्षाचे आमदार व नगरसेवकांनी जणू बिल्डर कडून सुपरीच घेतली आहे. दररोज हे आमदार व नगरसेवक दररोज येथील नागरिकांना दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी देत आहेत,महिलांवर हात उचलत आहे. असे असूनही पोलीस प्रशासन काहीही कारवाई करायला तयार नाही.येथील नागरिकांसाठी पुणे महानगरपालिकेने बांधून दिलेले शौचालय देखील पडण्याचा प्रयत्न या बिल्डर कडून करण्यात आला आहे.

 

राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे राज्य असल्याचे चित्र पाहायला मिळत नाहीये कारण स्वतः लोकप्रतिनिधी अश्याप्रकारे कायदा हातात घेत आहेत.
सर्वप्रथम या नागरिकांवर सुरू असणारी धाक दडपशाही बंद व्हावी, या नागरिकांना संरक्षण मिळावे.
या नागरिकांचे पुनर्वसन करायचे असल्यास त्यांना विश्वासात घेत अधिकृत जागेत त्यांचे पुनर्वसन करावे.
याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे (NCP) शिष्टमंडळ पुणे पोलिस कमिशनर (Pune Police Commissioner) व
पुणे महानगरपालिका आयुक्त (PMC Commissioner) यांची सोमवारी भेट घेणार आहे,
अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरअध्यक्ष प्रशांत जगताप (NCP Prashant Jagtap) यांनी आज सकाळी आनंदननगर येथील भेटीदरम्यान दिली.
याप्रसंगी पक्षाचे प्रवक्ते प्रदीप देशमुख (NCP Pradeep Deshmukh), महिला आघाडीच्या शहरअध्यक्षा मृणालिनी वाणी,
पर्वती विधानसभेचे अध्यक्ष संतोष नांगरे, गौरव घुले, या प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप,
प्रवक्ते प्रदीप देशमुख,मृणालिनी वाणी,संतोष नांगरे,प्रमोद गालिंदे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

Web Title :- Pune News | Rehabilitation of as many as 25 families in Anandnagar in 5-storied building illegally constructed in 3 clusters on hilltop hillslope

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis On Sharad Pawar | शरद पवारांच्या ‘त्या’ आरोपावर देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

 

Gold Price Weekly | ‘या’ आठवड्यात अचानक स्वस्त झाले सोने, परदेशी बाजारात सुद्धा घसरला भाव

 

BJP Ashish Shelar | ‘आता तुमच्या पक्षाला पेंग्विन सेना म्हणायचं का?’ – आशिष शेलार