Maharashtra Political Crisis | CM एकनाथ शिंदेंसमोर नारायण राणेंचे सूचक विधान; म्हणाले – ‘शिल्लक राहिलेली काँग्रेस आम्ही वाटून घेऊ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (BJP Leade And Union Minister Narayan Rane) यांच्या निवासस्थानी जावून गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. काँग्रेसमधील (Congress) एका मोठ्या नेत्यासह पक्षातील आमदारांचा एक गट (Congress MLAs Group) भाजपात (BJP) जाणार असल्याची चर्चा आहे. या मुद्द्यावर बोलताना नारायण राणे यांनी म्हटले आहे की, भाजप थेट कृती करते. त्याचबरोबर शिल्लक राहिलेली काँग्रेस आम्ही वाटून घेऊ. (Maharashtra Political Crisis)

 

नारायण राणे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी घेतलेला एक निर्णय मला आवडला. मागील अडीच वर्ष असलेले सरकार घरी पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला, तो मला खूपच आवडला. त्यामुळे मी त्यांना अभिनंदन करण्यासाठी बोलावले होते. (Maharashtra Political Crisis)

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या भेटीबद्दल म्हणाले, ही सदिच्छा भेट होती. जुन्या आठवणी निघाल्या. मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीतील अनुभवांबद्दल चर्चा झाली. काँग्रेसमधील एक गट सरकारमध्ये सामील होणार असल्याची चर्चा सुरू झाल्यासंदर्भात, काँग्रेसबद्दल बोलत नाही. सभागृहात बोललो आहे. त्यांची जी काय फरफट सुरूये, ती आपण पाहत आहोत. कुणावर टीका करण्याचा माझा स्वभाव नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

 

शिंदे म्हणाले, आम्ही जनतेच्या मनातील भावना जागृत केली. जे अडीच वर्षांपूर्वी व्हायला हवे होते.
लोकांच्या मनात जे होते, तो निर्णय आम्ही घेतला. बाळासाहेबांची भूमिका आम्ही पुढे घेऊन जात आहोत.
काँग्रेसचे नेते सरकारमध्ये येणार असल्याचे मला माहिती नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

 

याच मुद्द्यावर नारायण राणे म्हणाले की, काँग्रेसमधून काँग्रेसवाले म्हणून येत नाहीत. ते त्यांच्या शिवसेनेत येत आहेत.
ते शिवसैनिक होणार. ते उलट चांगले काम करत आहेत.
एक तर ते शिंदे गटाच्या शिवसेनेत जातील नाहीतर भाजपात येतील.
जी काँग्रेस शिल्लक राहिलेली आहे, ती आम्ही वाटून घेऊ, असे विधान राणे यांनी केले.

 

Web Title : –  Maharashtra Political Crisis | bjp union minister narayan rane reaction in front of cm eknath shinde over congress leader could be left the party

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा