अखेर पाकिस्ताननं जगासमोर ‘सत्य’ स्विकारलं, UN मध्ये सांगितलं काश्मीर भारताचा ‘अविभाज्य’ अंग

जिनिव्हा : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे असे भारताने अनेकवेळा सांगितले. जगातील सर्व देशांनी देखील हे मान्य केले आहे. मात्र, पाकिस्तान काश्मीरचा उल्लेख भारत व्याप्त काश्मीर असे करत होता. परंतु आता पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनीच आंतराष्ट्रीय व्यासपीठावर काश्मीर हे भारतातील राज्य असल्याचे मान्य केले आहे.

चूक लक्षात येताच केले आरोप –
काश्मीर भारताचा अंतर्गत मुद्दा नसल्याचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी संयुक्त राष्ट्रासमोर बोलताना म्हटले. काश्मीरच्या मुद्यावर भारताविरोधात तथ्यहिन आरोप त्यांनी केले आहे. आगोदर काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे सांगितल्यानंतर आपली चूक लक्षात येताच कुरैशी यांनी भारतावर आरोप केले.

भारताने काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य झाली असल्याचा दावा केला आहे. पण मग भारत काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमं, संस्थांना जाण्याची परवानगी का देत नाही ? त्यांना माहिती आहे असे केले तर सत्य जगासमोर येईल असे कुरैशी यांनी म्हटले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –