ISI कट फसला, हनीट्रपव्दारे भारतातील ‘या’ शहरात जासूसी करून घेत होता पाकिस्तान,

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताशी संबंधित गुप्त माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तान विविध मार्ग अवलंबत आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने भारतीय वायु सेना आणि लष्कराशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी पुन्हा एकदा हनी ट्रॅपचा मार्ग निवडला, पण वेळेतच सुरक्षा यंत्रणांनी त्या एजंटला पकडून त्याची योजना फोल ठरवली.

वास्तविक ज्या ५१ वर्षीय भारतीय हनीफ (नाव बदलले आहे) याला मिलिटरी इंटेलिजेंस (एमआय) युनिट आणि उत्तर प्रदेश एटीएसने आयएसआयच्या रॅकेटमधून वाचवले होते, त्यालाच हनी ट्रॅपच्या जाळ्यात फसवून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात होता.

गुप्तचर संस्था आणि एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद हनीफच्या माध्यमातून आयएसआय गोरखपूर रेल्वे स्टेशन, भारतीय वायुसेना स्टेशन आणि कुंद्रा घाट सैन्य स्थानकाची माहिती आणि छायाचित्रे गोळा करण्याचा प्रयत्न करत होते. हनीफला यासाठी ब्लॅकमेलही केले जात होते. त्याच्याकडे भारतीय सैनिकांच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’च्या एकूण संख्येची माहितीही मागितली जात होती.

हनीफ २०१४ ते २०१८ दरम्यान पाकिस्तानला आपल्या नातेवाईकांच्या घरी गेला होता. त्याचवेळी हनीफला आयएसआयने जाळ्यात अडकवले होते. त्याला शेवटच्या दिवशी वेश्यागृहात नेऊन तिथे त्याचा व्हिडिओ बनवला गेला. नंतर त्याच व्हिडिओचा वापर करून उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडील शहरांमध्ये संवेदनशील ठिकाणांची छायाचित्रे पाठवण्यासाठी आयएसआयने त्याला ब्लॅकमेल करणे सुरू केले.

मात्र भारतीय एजन्सींनी लवकरच आयएसआयचा हा धोकादायक कट शोधून काढला आणि ‘ऑपरेशन गोरखधंधा’ सुरू केले. कोरोना विषाणूशी संबंधित निर्बंध असतानाही उत्तर प्रदेश एटीएसने ५ ऑगस्टला राम मंदिराचे भूमिपूजन आणि स्वातंत्र्यदिनी या घटनेचा मागोवा ठेवण्यासाठी सतर्कता राखली आणि संयुक्त पथकाने गोरखपूरमधील संशयिताच्या कारवायांवर नजर ठेवली.

गोरखपुरमध्ये चहाचे दुकान चालवणाऱ्या हनीफच्या सेलफोन क्रमांकाच्या संशयास्पद कारवायांचे प्रथम इनपुट जम्मू-काश्मीरमधील लष्करी इंटेलिजेंस (एमआय) भागातून आले होते. लखनऊ येथील एमआय युनिटने ताबडतोब कारवाई सुरु केली आणि हनीफला गोरखपूरमध्ये पकडले.

गुप्तचर समूहाने त्यातून संकलित केलेले सर्व इनपुट काळजीपूर्वक ताब्यात घेतले. संशयित म्हणून मोहम्मद हनीफची ओळख पटली आणि त्याचा पाकिस्तानशी संबंधाचा शोध घेतला.

एमआय युनिटने जुलैच्या पहिल्या आठवड्यात उत्तर प्रदेश एटीएसशी सर्व निष्कर्ष शेअर केले आणि या संवेदनशील प्रकरणात पुढील कारवाई करण्यासाठी एक संयुक्त टीम तयार केली.

मात्र तपासणीनंतर समजले की, पाकिस्तानमध्ये नातेवाईकांना भेटायला गेलेला चहा विकणारा शत्रू देशाच्या हेरगिरीच्या खेळात कसा अडकला. सुरुवातीला हनीफने कोणत्याही बेकायदेशीर किंवा देशविरोधी कार्यात सामील होण्यास नकार दिला, पण लवकरच तो सुटला. यानंतर त्याने आयएसआयचा कट उघड केला.