PAK लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, चौघांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शनिवारी पाकिस्तानात लष्कराचे एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं. हे हेलिकॉप्टर गिलगिट-बाल्टिस्तान भागात कोसळलं. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला, अशी माहिती लष्कराकडून देण्यात आली. काही तांत्रिक अडचणीमुळे हे हेलिकॉप्टर कोसळले. यात एका मृत सैनिकाचा मृतदेह होता. हा मृतदेह लष्करी रुग्णालयाकडे नेत होते. असं आयएसपीआरच्या स्टेटमेंटमध्ये हे म्हटलं आहे.

आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, हे हेलिकॉप्टर ज्या भागात कोसळले, त्या ठिकाणी जमिनीवर कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले. दोन सैनिकांसह मेजर रँकचा वैमानिक आणि सह वैमानिक या अपघातात ठार झाले. तसंच, दुर्गम भागात ज्या ठिकाणी मानवी वस्ती नाहीय, अशा ठिकाणी हा अपघात झाला असे सूत्रांनी शिन्हुआ वृत्त संस्थेला सांगितलं. अपघातानंतर लष्करी टीम्स घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी तिथून पाच मृतदेह ताब्यात घेतले.