Coronavirus : पाकिस्तानमध्ये ‘कोरोना’मुळे 33 जणांचा मृत्यू तर 1452 नवीन रुग्ण, बाधितांचा आकडा 35788 तर आतापर्यंत 770 बळी

इस्लामाबाद :  वृत्तसंस्था –  जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून जगभरातील प्रत्येक देशात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. पाकिस्तानमध्ये देखील कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. पाकिस्तानमध्ये कोरोना व्हायरसचे 1452 नवे प्रकरणे समोर आली आहेत. त्यामध्ये 33 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पाकिस्तानमध्ये 35788 जणांना कोरोनाची बाधा झाली असून 770 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती गुरुवारी आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

राष्ट्रीय आरोग्य सेवा मंत्रालयानुसार, पंजाब प्रांतमध्ये 13561, सिंध मध्ये 13341, खैबर-पख्तूनख्वा मध्ये 5252, बलूचिस्तान 2239. इस्लामाबातमध्ये 822, गिलगिट-बाल्टिस्तान 482 रुग्ण आढळून आले आहेत. तर पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमध्ये 91 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.

पाकिस्तानमध्ये 33 जणांच्या मृत्यमूळे देशातील मृतांची संख्या 770 वर पोहचली आहे. मंत्रालयाने सांगितले की, देशात कोरनाबाधितांची संख्या 35788 पर्यंत पोहचली आहे. मागील 24 तासात 1452 नवीन रुग्ण आढळून आले आहे. तर 9695 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 3 लाख 30 हजार 750 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या असून त्यापैकी मागील 24 तासात 13 हजार 051 चाचण्या करण्यात आल्या आहेत.