बिकिनीत दिसली तुर्की शो ‘एर्तुगरूल गाझी’ची अ‍ॅक्ट्रेस ‘बुर्कू किरातली’, पाकिस्तानी चाहत्यांनी केलं प्रचंड ट्रोल ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अलीकडेच तुर्की शो एर्तुगरूल गाझी (Ertugrul Ghazi) नं पाकिस्तानात रेकॉर्ड बनवलं होतं. सीरिजची आणि यातील कलाकारांची खूप प्रशंसा झाली. परंतु आता या सीरिजमधील अॅक्ट्रेस बुर्कू किरातली (Burcu Kiratli) बिकिनी घातल्यानं पाकिस्तानी जनतेकडून प्रचंड ट्रोल होत आहे.

https://www.instagram.com/p/BlYC0tmHZL_/

बुर्कूचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो 2019 मधील आहे. तिचा हा व्हिडीओ तिच्या इंस्टावर उपलब्ध आहे. व्हिडीओत बिकिनी घालून ती वाटर पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे. अनेकंनी धर्माचा हवाला देत तिला ट्रोल केलं आहे. नको नको ते ऐकवलं आहे. बुर्कूनं या शोमध्ये रोशनी खातून ही भूमिका साकारली होती. तिची अॅक्टींग खूपच चर्चेत होती.

ट्रोलर्सनं केल्या ‘अशा’ कमेंट

अनेकांनी बुर्कूच्या पोस्टवर कमेंट करत तिला सुनावलं आहे. काहींनी शेम शेम असं लिहलय. एकानं लिहिलंय, हे पाहून खूप वाईट वाटत आहे. तू मुस्लिम धर्माची आहेस आपल्या संस्कृतीत या सगळ्याला परवानगी नाही. एकानं म्हटलं की, ही बकवास बंद कर आणि जर सभ्य बन. एकानं म्हटलं, एर्तुगरूलमध्ये तू काय परफॉर्म केलं आहे आणि आता असं करत आहेस. शेम शेम. एकानं लिहलं की, अल्लानं तुला योग्य रस्ता दाखवावा. एकजण म्हणाला, तू इस्लाम धर्मीय भूमिका साकारली आहेस. असे फोटो योग्य नाही.

काहींना बुर्कूला सपोर्टही केलाा आहे आणि ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिलं आहे. एकजण म्हणाला, भाई ती स्विमिंग करत आहे. तुझी काय इच्छा आहे, तिनं पूलमध्येही बुर्खाच घालावा का. एकानं लिहिलं, पाकिस्तानीयांनो वाईट कमेंट करणं बंद करा. आधी तुमच्या पाकिस्तानी अॅक्ट्रेसला पहा.

एर्तुगरूल गाझी (Ertugrul Ghazi) ही तुर्कीश सीरिज 2014 मध्ये तुर्कीत रिलीज झाली होती. पाकिस्तानात लॉकडाऊनमध्ये काही दिवसांपूर्वी हा शो खूप फेमश झाला होता.

https://www.instagram.com/p/BWPxS5kHNJS/