Coronavirus : ‘कोरोना’पासून बचावासाठी पाकिस्तानकडं पैसे नाहीत, पण केली होती चीनला ‘मदत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तान वारंवार कोरोना विषाणूच्या घेऱ्यात येत आहे. सध्या तेथे 301 संक्रमणाची नोंद झाली आहेत. बहुतेक हे रुग्ण सिंधमधून आले असून तेथे रूग्णांची संख्या 208 आहे. याखेरीज पंजाबमध्ये 33, खैबर पख्तुख्वांमध्ये 19, बलुचिस्तानमध्ये 23, इस्लामाबादमध्ये 2 आणि गुलाम काश्मीरमध्ये 16 लोक आहेत. पाकिस्तानमध्येही एकाचा मृत्यू झाला आहे. पण त्यांना वाचवण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे ना पैसा आहे ना आवश्यक साधने. हे आपणास ऐकण्यास विचित्र वाटेल पण हे सत्य आहे.

इम्रान खान यांच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट दिसत आहे. कोरोना विषाणूचा वाढता उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर गरीब देशांचे कर्ज माफ करावे व त्यांना सवलत द्यावी अशी विनंतीही त्यांनी केली. याशिवाय मंगळवारी जेव्हा त्यांनी टीव्हीवर देशावर भाषण केले तेव्हा त्यांनी हे स्पष्ट केले की पाकिस्तान हा एक अतिशय गरीब देश आहे. म्हणूनच, दुसऱ्या देशांप्रमाणे इथे प्रत्येक गोष्टीवर ताळेबंदी किंवा राष्ट्रीय शटडाउन केले जाऊ शकत नाही. जर हे केले तर लोक उपासमारीने लोक मरतील. यापूर्वी पाकिस्तानमध्ये या विषाणूचा सामना करण्यासाठी आवश्यक गोष्टींची कमतरता देखील होती.

टीव्हीवर ते ज्या पद्धतीने बोलत होते त्यावरून हे स्पष्ट झाले की तेथे परिस्थिती अतिशय वाईट होईल. पण यासाठी इतर कोणीही जबाबदार नाही. आपल्या गरीबीचे दुःख घेऊन रडणारे इम्रान खान यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये चीनला कोरोनापासून वाचवण्यासाठी मास्कसह इतर आवश्यक वस्तू जबरदस्तीने पुरवल्या होत्या. असा दावा चीनमधील एका वृत्तसंस्थेने केला आहे. तथापि, चिनी वृत्तपत्राने त्यास सकारात्मक दृष्टीने सादर केले असून यास दोन्ही देशांमधील चांगली मैत्री असल्याचे म्हटले आहे. पण इथे प्रश्न असा आहे की जेव्हा कोरोना विषाणू जगभर पसरला होता, तेव्हा पाकिस्तानने इथल्या परिस्थितीवर डोळे बंद केले होते. आता तेथे कोरोना विषाणूची प्रकरणे सतत वाढत आहेत आणि आता त्यांना त्यांची गरीबी आठवत आहे.

आता पाकिस्तानमधील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे, तेव्हा इम्रान खान केवळ आपल्या लोकांना चुकीचा विश्वास देण्यात व्यस्त आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला, टीव्हीवर हजर होण्यापूर्वी त्यांनी दोन ट्विट केले होते, की ते कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी घेतलेल्या पाऊलांचा आढावा घेत आहेत. परंतु जेथे आधीच सॅनिटायझर्स आणि मास्कची कमतरता आहे तेथे या पाऊलांना केवळ पोकळ दावे म्हटले जाऊ शकते.

मंगळवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या संबोधनात या विषाणूचा सतत वाढत जाणाऱ्या प्रादुर्भावाविषयी चिंता वाटत असल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर पाकिस्तानमध्ये सर्व बंद केले गेले तर इथले लोक उपासमारीने मरतील.

इतकेच नाही तर आता त्यांनाही वाटते की, त्यांचे आंतरराष्ट्रीय कर्ज माफ करण्याची किंवा सवलत देण्याची ही उत्तम संधी आहे. पाकिस्तानचे अध्यक्ष बुधवारी दोन दिवसांच्या चीन दौर्‍यावरुन परत आले आहेत. तथापि, कोरोना विषाणूविरूद्ध लढण्याच्या पाकिस्तानच्या आश्वासनातून त्यांना फारसे काही मिळाले नाही. असे असूनही पाकिस्तानही चीनकडे पाहत आहे. त्यांना वाटते की चीन त्यांना कोरोना विषाणूंविरूद्ध लढण्यास मदत करेल आणि सर्व काही निश्चित होईल. या विचारसरणीमुळे इम्रान खान यांनी सार्क देशांच्या त्या चर्चेत भाग घेतला नाही, ज्याची सुरुवात भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार, जगातील 166 देश आता कोरोना विषाणूच्या चक्रात सापडले आहेत. यामुळे संपूर्ण जगात 8657 मृत्यू तर आतापर्यंत 2,07,860 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.