कुलभूषण जाधव यांची भारतीय अधिकारी भेट घेणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानात मृत्यूच्या शिक्षेशी झुंज देणाऱ्या भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांनी उद्या म्हणजे शुक्रवारी कॉन्सुलर अ‍ॅक्सेस (राजनयिक पोहोच) दिली जाणार आहे . यामुळे आता ते भारतीय अधिकाऱ्यांना भेटू शकणार आहेत. ही माहिती आज पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद फैसल यांनी दिली आहे. तर दुसरीकडे भारताच्या विदेश मंत्रालयाकडून या प्रस्तावावर विचार करणार असून लवकरच कुलभूषण यांची भेट घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

भारतीय नौदलाचे सेवानिवृत्त अधिकारी जाधव (४९) यांना पाकिस्तानच्या न्यायालयाने ‘हेरगिरी आणि दहशतवाद’ या आरोपांमुळे एप्रिल २०१७ मध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेली होती. यानंतर या शिक्षेची अंमलबजावणी थांबवण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा (इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस) दरवाजा ठोठावला होता. त्यानुसार न्यायालयाने नुकतीच त्यांच्या शिक्षेस स्थगिती दिली आहे.

पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयातर्फे फैसल यांनी साप्ताहिक पत्रकार परिषदेत भारत सरकारला आमच्या निर्णयाबद्दल सांगितल्यानंतर आम्ही भारताकडून उत्तराच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगितले.

अशी आहे भारताची प्रतिक्रिया :

भारतीय परकीय मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी सांगितले की. पाकिस्तानने भारताकडे प्रस्ताव पाठवला असून आम्ही पाकिस्तानला सर्व बाजूंचा आणि शक्यतांचा पडताळा घेऊन विचारपूर्वक उत्तर देऊ.

आयसीजे ने १७ जुलै ला आदेश दिल्यानंतर त्याचा परिणाम म्हणून पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे. आयसीजे ने पाकिस्तानला जाधव यांच्या शिक्षेवर ‘प्रभावी समीक्षा आणि पुनर्विचार’ करण्यास म्हटले होते. त्याचबरोबर भारताला कॉन्सुलर एक्सेस देण्याचेही निर्देश दिले होते.

आरोग्यविषयक वृत्त –