Pakistan Webseries | सोशल मीडियावर होतोय ‘या’ पाकिस्तानी वेबसीरिजला प्रचंड विरोध; पहिला भाग युट्यूबवर प्रदर्शित

पोलीसनामा ऑनलाइन टीम : Pakistan Webseries | जगभरात भारतातील चित्रपट ज्याप्रमाणे धुमाकूळ घालत असतात अगदी त्याप्रमाणे आता पाकिस्तानातील काही चित्रपटदेखील भारतामध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाले आहेत. ख्रिसमसच्या मुहूर्तावर हे चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे, तर भारतातदेखील पाकिस्तानी कलाकार फवाद खानचे चाहते असल्याने ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित करण्यात येण्याची शक्यता आहे. या चित्रपटाने संपूर्ण जगभरात दहा मिलियन डॉलर इतकी कमाई केली होती. त्यानंतर 23 डिसेंबर रोजी हा चित्रपट भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Pakistan Webseries)

 

मात्र, या चित्रपटाला बऱ्याच राजकीय पक्षांकडून विरोध दर्शवण्यात आला होता. एवढेच नाही तर महाराष्ट्रातदेखील या चित्रपटाला विरोध करण्यात आला, तर दुसरीकडे अभिनेता रणबिर कपूर आणि इतर बॉलिवूड कलाकारांनी मात्र या चित्रपटाला पाठिंबा दिल्याने हा वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर आता या चित्रपटा पाठोपाठ एक पाकिस्तानी वेब सीरिजदेखील चर्चेत आहे. (Pakistan Webseries)

‘सेवक – द कनफेशन’ नावाची ही पाकिस्तानी वेब सीरिज सध्या चर्चेत आहे.
नुकताच या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यामध्ये 1984 च्या दंगली, गुजरात दंगल आणि अयोध्याची घटनासुद्धा दाखवण्यात आली आहे.
मात्र या ट्रेलरवरून काही हिंदू संघटनांनी या वेब सीरिजचा विरोध दर्शवला आहे,
तर त्यांच्या मते या वेब सीरिजच्या ट्रेलरमधून हिंदू संत तसेच भारतीय संघटना यांचे नकारात्मक चित्रण केल्याचे म्हटले गेले आहे, तर या वेब सीरिजचा पहिला भाग यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला,
तर सोशल मीडियावर सध्या या वेब सीरिजला जबरदस्त विरोध होताना दिसत आहे.
याआधी 2016 मध्ये जम्मू काश्मीरमधील उरी येथील भारतीय लष्कराच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यानंतर
‘इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन’ने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी आणली होती ती बंदी आजही तशीच सुरू आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा भारतात पाकिस्तानी चित्रपट आणि वेब सीरिडजवरून मनोरंजन विश्वातील वातावरण काहीसे तापल्याचे दिसत आहे.

 

Web Title :- Pakistan Webseries | pakistani webseries seval the confessiona trailer controversy on social media

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | ‘कर्नाटकचे मुख्यमंत्री काहीही बोलू देत आम्हाला घेणे-देणे नाही; आमचे मुख्यमंत्री तोंड कधी उघडणार?’ – संजय राऊत

Ahmednagar Crime | कॉलेजच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपला जॉइन न केल्याने विद्यार्थ्याची शिक्षिकेला शिवीगाळ

Sulochana Chavan Passed Away | लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचे निधन; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास