पाकिस्ताननं स्वतःच्या पायावर मारली ‘कुऱ्हाड’, टोमॅटो आणि कांद्याच्या भावाची ‘उच्चांकी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या मुद्द्यावरून पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. यामुळे पाकिस्तानने भारताशी द्विपक्षीय व्यापार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पाकिस्तान कुठलाही माल भारताकडून विकत घेणार नाही तसेच तो कुठल्याही वस्तूची विक्री भारतात करणार नाही. पण पाकिस्ताचा हा निर्णय पाकिस्तानवरच उलटण्याची चिन्हे आहेत.

वास्तविक, दैनंदिन गरजेच्या सर्व वस्तूंसाठी पाकिस्तानवर भारताचे अवलंबित्व कमी आहे, तर पाकिस्तान स्वतःच भारतावर अधिक अवलंबून आहे. कांदा आणि टोमॅटो यासारख्या वस्तू पाकिस्तान भारताकडून मागवतो. व्यापार बंद करण्याच्या निर्णयानंतर स्वत: पाकिस्तानलाच अधिक त्रास होईल. पाकिस्तानमध्ये टोमॅटो आणि कांद्याची कमतरता भासणार आहे. याशिवाय पाकिस्तानने सर्व कृषी उत्पादनांसाठीही भारतावर अवलंबून आहे. आता तोटा म्हणजे पाकिस्तानमध्ये टोमॅटो आणि कांदे अजून महाग होतील.

इतकेच नाही तर पाकिस्ताननेही ३७० कलम हटविण्याच्या निषेधार्थ हवाई क्षेत्र अर्धवट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी गुरुवारी रात्री आपल्या एअरस्पेसचा एक कॉरिडोर बंद केला. दरम्यान, काश्मीरबाबतच्या भारताच्या निर्णयानंतर इम्रान खान यांनी तेथील परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी बुधवारी राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक घेतली आणि अनेक निर्णय घेतले.

काश्मीर प्रश्नासाठी मंगळवारी पाकिस्तानच्या संसदेत संयुक्त अधिवेशन बोलवण्यात आले. आणि जेव्हा इम्रान खान संसदेत बोलत होते, तेव्हा ते विरोधकांना म्हणाले, आपण भारतावर आक्रमण करायचे का? असा प्रश्न करून इम्रान खान यांनी युद्धाची भाषा केली.

आरोग्यविषयक वृत्त