पुन्हा परतले पाकिस्तानचे चाँद नवाब ! यावेळी राष्ट्रपतींच्या इंटरव्ह्यूवरून सुरू आहे धमाल, पहा व्हिडीओ

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पत्रकार चाँद नवाब तर तुम्हाला आठवतच असतील. ते आणि त्यांची स्टाईल कुणी विसरूच शकत नाही. कारण, एका व्हिडिओने त्यांना एका रात्रीत फेमस केले होते. त्यांची स्टाईल लोकांना पसंत पडली होती. तर, चाँद नवाब पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांचा एक व्हिडिओ वेगाने वायरल होत आहे. परंतु, सध्याचा व्हिडिओ अतिशय खास आहे. कारण, चाँद नवाब यांनी यावेळी पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांचा इंटरव्ह्यू घेतला आहे.

 

 

 

 

चाँद नवाब यांची बोलण्याची शैली लोकांना खुप पसंत पडली आहे. जी या व्हिडिओत तुम्ही स्पष्ट पाहू शकता. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर हा व्हिडिओ पत्रकार Naila Inayat ने शेयर केला आहे. या व्हिडिओत चाँद नवाब पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांच्याशी बोलत आहेत. चाँद नवाब म्हणतात की, आमच्या सोबत उपस्थित आहेत सद्र ए पाकिस्तान डॉक्टर आरिफ अल्वी साहेब. जे रविवारच्या दिवशी गोल्फ सुद्धा खेळत आहेत. तर, पाकिस्तानचे राष्ट्रपती चाँद नवाब यांना म्हणतात की, मला माहित आहे. तुम्हाला शुभेच्छा. पाकिस्तान ज्या प्रकारे प्रगती करत आहे, त्यामध्ये सर्वांचे हृदय, बुद्धी लागली आहे.

ईदच्या दरम्यान चाँद नवाब रेल्वे स्टेशनवर रिपोटिंग करत होते, तेव्हा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर खुप वायरल झाला होता. तर, त्यांचा नवा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर धमाल उडवत आहे. हा व्हिडिओ अनेक लोकांनी पसंत केला आहे. हा व्हिडिओ 10 हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून लोक त्यांचे जोरदार कौतूक करत आहेत.