पाकिस्तानातील पेट्रोलचे दर ऐकाल तर बसेल ‘धक्‍का’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली असताना आता पाकिस्तानात सामान्यांना महागाईच्या भस्मासुरांने नाके नऊ आणले आहे. पाकिस्तानात महागाई किती वाढते आहे हे यावरुन कळेल. पाकिस्तानात भाज्या आणि दुधाच्या किंमती इतक्या वाढल्या आहेत की लोक महागाईने हैराण झाले आहेत. यात भर पडली आहेत ती येथील पेट्रोल, डिझलच्या वाढत्या किंमतींची.

मे महिन्यात पेट्रोलच्या किंमतीत ९ रुपये प्रति लीटरने वाढ
दरम्यान, पाकिस्तानच्या आर्थिक समन्वय समिती (ESS) ने या संदर्भात बैठक घेऊन पेट्रोलियम उत्पादनांवरील किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार मे महिन्यात पेट्रोलियम पदार्थांच्या किंमतीत ९ रुपये प्रति लीटरने वाढ केली होती.

पाकिस्तानात ही आहे पेट्रोलची किंमत
यात वाढ झाल्याने पाकिस्तानातील पेट्रोलच्या किंमती १०८ रुपये प्रति लीटर एवढ्या वाढल्या. यात डिझेलच्या किंमतीत देखील वाढ करण्यात आली असून ती ७.४६ प्रति लीटर करण्यात आली. भारतात पेट्रोलचे भाव ७८ रुपये प्रतिलीटर आहे.

असे असले तरी पेट्रोलच्या किंमतीत याहून आधिक वाढ झाली असती, कारण तेल आणि गॅस नियामक प्राधिकरणाने पेट्रोलच्या किंमतीत १४ रुपये एवढ्या वाढीची शिफारस केली होती. मात्र पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी हे प्रकरण ईसीसी कडे सोपावले. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या किंमतींमुळे आणि चलन घसरल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

पाकिस्तानात आता पेट्रोलच्या भावाचा भडका उडाल्याने सामान्य लोकांचे हाल होत आहेत. तर महागाई गगनाला भिडलेली आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे.