पालघर : अटीतटीच्या लढतीत शिवसेनेचे राजेंद्र गावित विजयी

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकीटावर निवडून आलेले खासदार राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली. पालघर लोकसभा मतदार संघामध्ये गावित यांची बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांच्याशी लढत झाली. या चुरशीच्या लढतीमध्ये राजेंद्र गावित यांनी ८८ हजार ५९८ एवढ्या मतांनी विजय मिळवला. तर बळीराम जाधव यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली. राजेंद्र गावित यांनी जाधव यांचा पराभव केला. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने ही जागा बहुजन विकास आघाडीला सोडली होती.

पालघरमध्ये १८ लाख ८५ हजार २९७ मतदारांची संख्या असून १२ लाख १ हजार २९८ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुषांचे प्रमाण ६४.८३ टक्के आहे तर महिलांचे प्रमाण ५१.४४ टक्के आहे. या मतदारसंघामध्ये एकूण ६२.९१ टक्के मतदान झाले आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात मे २०१८ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत ५३.२२ टक्के मतदान झाले होते. यावेळी एकूण ९.६९ टक्के वाढ झाली आहे.

उमेदवार पक्ष मिळालेली मतं
राजेंद्र गावित शिवसेना ५७९९८९
बळीराम जाधव बहुजन विकास आघाडी ४९१३९१
पालघरमधील एकूण मतदान – १८ लाख ८५ हजार २९७
पालघरमध्ये झालेले मतदान – १२ लाख १ हजार २९८