Palkhi Sohala 2023 | महसूल आणि वन विभागातर्फे पालखी विसाव्याच्या ठिकाणी रोपांचे वाटप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Palkhi Sohala 2023 | जिल्हाधिकारी पुणे (Pune Collector) यांचे संकल्पनेतुन आणि मुख्य वनसंरक्षक व उपवनसंरक्षक पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल आणि वन विभागाच्यावतीने हरितवारी अभियानांतर्गत पालखी विसाव्याच्या ठिकाणी रोपे, बीजगोळे व बीया वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. (Palkhi Sohala 2023)

 

हे अभियान पालखी मार्गावरील वन परिक्षेत्राच्या सहकार्याने राबविण्यात येत असून भांबुर्डा व पुणे वनपरिक्षेत्रात सासवड वनपरिक्षेत्रात ५ हजार बीजगोळे व २५ हजार बीया वाटप करण्यात आल्या. तसेच मौजे लोणी काळभोर येथे ५० वारकऱ्यांमार्फत ५० वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमास वारकरी संप्रदायाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

वनविभागाकडून पालखी विसाव्याच्या ठिकाणांवर देहुगाव, आळंदी, जेजुरी, वाल्हे, नीरा, लोणंद, फलटण,
बारामती, बेलवाडी रिंगण, वालचंदनगर व नातेपुते येथे वारकऱ्यांना बीज, बीजगोळे,
रोप वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती वन विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

 

Web Title :  Palkhi Sohala 2023 | Pune Collector Distribution of saplings at palanquin resting place by revenue and forest department

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा