Sanjay Raut Threat Case | संजय राऊतांना धमकी देणाऱ्या मयुर शिंदेला अटक, सुरक्षा वाढवण्यासाठी राऊतांनी बनाव रचल्याची चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सकाळचा भोंगा बंद करा, अन्यथा महिन्याभरात तुम्हा दोघांनाही गोळ्या घालू अशी धमकी संजय राऊत (Sanjay Raut Threat Case) आणि सुनिल राऊत (Sunil Raut) यांना दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी मयुर शिंदेला (Mayur Shinde) अटक (Arrest) केली आहे. राऊतांची सुरक्षा वाढावावी यासाठीत्याने बनाव रचल्याची चर्चा आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) सूत्रांनी ही माहिती आहे. मयुर शिंदे हा सुनील राऊतांचा निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे. याबाबत एका वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे. (Sanjay Raut Threat Case)

 

संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली आहे. मयुर शिंदे हा संजय राऊतांच्या जवळचा आहे. त्याने राऊतांची सुरक्षा वाढवण्यासाठी हा बनाव रचला होता. मयुर शिंदेने स्वत: फोन न करता जवळच्या साथीदारांना फोन करण्यास सांगितले. या मगचा मुख्य सुत्रधार शिंदे हा असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. (Sanjay Raut Threat Case)

 

ट्विट पहाण्यासाठी क्लिक करा

 

 

मयुर शिंदे हा गेली अनेक वर्ष सुनील राऊत यांच्यासोबत काम करत आहे. तो कायम त्यांच्यासोबत असतो. मुलुंड, भांडुप, विक्रोळी परिसरात त्याचा दबदबा आहे. सध्या मयुर शिंदे एका वेगळ्या पक्षासाठी काम करत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे.

 

राऊत बंधू राजकारणी की गँगस्टर?

दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande) म्हणाले, संजय राऊत आणि सुनील राऊत यांचे गँगस्टर (Gangster) लोकांशी संबंध आहेत. माझ्यावर हल्ला करणारा व्यक्ती देखील संजय आणि सुनील राऊत यांच्या जवळील आहे.
राऊत बंधू हे राजकारणी आहेत की गँगस्टर आहेत? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
धमकीचा बनाव रचण्यासाठी मयुर शिंदेचा वापर राऊत बंधूंनी केला आहे.
तसेच संजय राऊत धमकी प्रकरणात मयूर शिंदे नामक व्यक्तीला अटक केली आहे का?
आणि केली असेल तर त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून धमकी दिली हे जनतेला समजलच पाहिजे.
मुंबई पोलिसांनी हे जाहीर करावं, असंही संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.

 

Web Title :  Sanjay Raut Threat Case | Shivsena UBT MP sanjay raut news mayur shinde has been arrested in
the sanjay raut threat case mumbai police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा