31 डिसेंबरपर्यंत केलं नाही ‘हे’ काम तर ‘अवैध’ होईल तुमचं PAN कार्ड, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयकर विभागाने पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2019 पर्यंत वाढवली आहे. आयकर विभागाच्या या आदेशानंतर पॅन कार्ड धाराकांसाठी हे आवश्यक झाले आहे की आपले पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. याला तुम्ही ऑनलाइन आणि एसएमएसच्या माध्यमातून लिंक करु शकतात. ही लागोपाठ मिळणारी 7 वी संधी आहे जेव्हा पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे.

अवैध होईल पॅन कार्ड
शक्यता आहे की पॅन कार्ड आधारला लिंक न केल्यास सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (CBDT) याच्या वापराला अवैध घोषित करेल. इनकम टॅक्स डिपार्टमेंटने सांगितले की जर कोणी आधारला पॅन लिंक करत नाहीत तर त्यांचे पॅन अवैध ठरवण्यात येईल. यानंतर अवैध पॅन अंतर्गत जी काही कायदेशीर तरतूद असेल तर त्याला फॉलो केले जावे. यामुळे मानन्यात येईल की व्यक्तीने पॅनसाठी अर्ज केला नाही.

वित्तीय विधेयकात काय माहिती देण्यात आली आहे
वित्तीय विधेयकानुसार डेटलाइन संपल्यानंतर लिंक न करण्यात आलेले पॅनला इनऑपेरिव्ह मानण्यात येईल. यामुळे शक्यता आहे की आयकर विभाग पॅन कार्डला लिंक केल्यानंतर त्याला वैध घोषित करेल. अशात हे योग्य ठरेल की जोखीम घेण्याऐवजी तुम्ही पॅन लिंक करा.

सध्याच्या नियमांनुसार तुम्ही पॅन ऐवजी आधार क्रमांक देखील देऊ शकतात. परंतू यानंतर आयकर विभाग हे गृहित धरेल की तुमच्याकडे पॅन नाही आणि तुमच्यासाठी नवे पॅन दिले जाऊ शकते. हे तेव्हाच होईल जेव्हा पॅन आणि आधार लिंक नसतील.

असे लिंक करा आधार आणि पॅन –

1) तुम्ही तुमच्या आधारला आयकर ई-फायलिंग पोर्टलच्या माध्यमातून किंवा एसएमएसच्या माध्यमातून लिंक करु शकतात. आयकर विभागच्या ई-फायलिंग पोर्टलवर (E-filing Portal) लिंक आधार असा पर्याय आहे. येथे तुम्हाला आधार आणि पॅन नंबर टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल. याद्वारे तुम्ही आधार लिंक करु शकतात.

2) दुसरा पर्याय आहे तुम्हाला 567678 किंवा 56161 वर SMS पाठवावा लागेल. यासाठी तुम्हाला UIDPAN<12 आकडी आधार नंबर>< 10 आकडी पॅन नंबर पाठवावा लागेल.

लिंक करताना लक्षात ठेवा या बाबी

1) पॅन आणि आधार लिंक करताना तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल की दोन्ही कागदपत्रवर तुमचे नाव, लिंग, जन्म तारीख एक असणे आवश्यक आहे.

2) जर या कागदपत्रात काही फरक असेल तर आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवण्यात येईल.

3) काही प्रकरणात पॅन आणि आधारचा नंबर पूर्ण वेगळा असेल तर लिंकिंग प्रक्रिया फेल होईल. तुम्हाला दोन्ही कागदपत्रांवरील डिटेल्स बदलावे लागतील.

Visit : Policenama.com

 

Loading...
You might also like