Panchak Marathi Movie | निरोगी जीवनासाठी कुटुंबीयांमध्ये सुसंवाद महत्त्वाचा : अभिनेत्री माधुरी दीक्षित

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Panchak Marathi Movie | प्रत्येक मनुष्य हा सुखाच्या मागे धावत असतो. परंतु जीवनात खऱ्या अर्थाने सुख मिळवायचे असेल तर निरोगी व सुदृढ शरीर मन अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन स्वास्थ्यम या आरोग्य सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्मात्या माधुरी दीक्षित- नेने (Madhuri Dixit Nene) व पती श्रीराम नेने (Shriram Nene) केले. सुहाना स्वास्थ्यम कार्यक्रमात आयोजित मुलाखतीत माधुरी व डाॅ. श्रीराम नेने बोलत होते. यावेळी या दोघांनी नातेसंबंध, पालकत्व आणि निरोगी आरोग्य या विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. (Panchak Marathi Movie)

या वेळी बोलताना माधुरी दीक्षित म्हणाल्या , घरातील आरोग्य चांगले ठेवायचे असेल, तर घरातील प्रत्येक व्यक्तीमध्ये सुसंवाद महत्वाचा आहे. पती-पत्नीमध्ये जर चांगला संवाद असेल तर संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य निरोगी राहते. याशिवाय घरातील प्रत्येक सदस्याने आपले जीवन निरोगी राहण्यासाठी दररोज काही वेळ काढला पाहिजे. (Panchak Marathi Movie)

आपल्या आगामी सिनेमाबाबत बोलताना माधुरी दीक्षित म्हणाल्या, दि. ५ जानेवारीला आमचा पंचक हा सिनेमा रिलीज होत आहे. या सिनेमात विनोदी अंगाने अतिशय गंभीर मुद्दा चित्रीत करण्यात आला आहे. हा सिनेमाचा प्रत्येकाच्या घराशी निकटचा संबंध स्थापित करणारा आहे, शिवाय एक महत्वाचा संदेशही यातून मिळतो. त्यामुळे प्रत्येकाने हा सिनेमा अवश्य बघावा. या चित्रपटाच्या पटकथेला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट पटकथेचा पुरस्कारदेखील मिळालेला आहे, असेही माधुरी म्हणाल्या.

प्रसिद्ध हृदयरोतज्ज्ञ डॉ. श्रीराम नेने यांनी यावेळी सांगितले, आरोग्य हा आपल्या जीवनातील अमूल्य ठेवा आहे.
त्यामुळे प्रत्येकाने दररोज थोडेफार आरोग्याचे संचित आपल्यामध्ये साठवणे गरजेचे आहे.
जर तुम्ही आता स्वतःच्या आरोग्याबाबत सुदृढतेची व निरोगीपणाची गुंतवणूक केली, तर ही गुंतवणूक तुम्हाला
संपूर्ण जीवनात महत्वाची ठऱते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्यासंदर्भात खूप सजग व जगरुक गरजेचे आहे.
याच भावनेतून आम्ही सुहाना स्वास्थ्यम या उपक्रमाअंतर्गत येथे सामिल झालो आहोत.
हे अभियान जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेल्यास संपूर्ण देशाचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Navardev BSc Agri | बकासुर आणि सुंदर या स्टार बैलजोडीने केला ‘नवरदेव’चा पोस्टर लॉन्च

Lingayat Vadhu Var | राज्यस्तरीय उच्चशिक्षित लिंगायत वधु-वर पालक परिचय मेळावा 3 डिसेंबरला पुण्यात

Sangali News | होऊ दे खर्च! मोठा भाऊ उपसरपंच झाला म्हणून हेलिकॉप्टरने गावाला तब्बल ३-४ तास प्रदक्षिणा

Pune Drug Case | ससून ड्रग रॅकेट : सुषमा अंधारेंना नाशिकहून निनावी पत्र; ललित पाटील प्रकरणाच्या धक्कादायक माहितीचा दावा

Monalisa Superhot Photo | मोनालिसाने सोफ्यावर बसून दिल्या हॉट पोज, व्हायरल फोटो पाहून नेटकरी गेले मोहून…